सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI, मेडिकल बोर्डाची बैठक; मंगळवारी मोठा खुलासा होण्याची शक्यता

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI, मेडिकल बोर्डाची बैठक; मंगळवारी मोठा खुलासा होण्याची शक्यता

या बैठकीत सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणी महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

ushant singमुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात सीबीआयने (CBI) तपास केल्यानंतर आता या तपासाबाबत मंगळवारी महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने याआधी अनेक खुलासे केले आहेत. आता सीबीआय आणि मेडिकल बोर्डाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंगळवारी ही बैठक होणार आहे.

एम्स रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत सीबीआय टीममार्फत एसआयटीचा रिपोर्ट आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल मांडला जाणार आहेत. यानंतर मेडिकल बोर्डाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मग मेडिकल बोर्ड आपला अंतिम अहवाल सादर करेल, अशी माहिती मिळते आहे.

हे वाचा - सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

20 सप्टेंबरला ही बैठक होणार होती मात्र काही कारणास्तव नाही झाली. आता मंगळवारी होणारी ही बैठक नेमकी कुठे होईल, याबाबत अजून स्पष्‍टता नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक सीबीआयच्या कार्यालयात होण्‍याची शक्यता आहे किंवा सीबीआयची टीम डॉ. सुधीर गुप्ता यांच्या एम्समधील कार्यालयात जाईल.

सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅबने  व्हिसेरा नमुन्यांची तपासणी केली होती. त्याचा अहवाल सीबीआयच्या तपास टीमकडे आला आहे. मात्र  आणखी काही अहवालांची प्रतीक्षा आहे. हे सर्व अहवालांना  मेडिकल बोर्डासमोर सादर केले जाणार आहे. यानंतर एम्सकडून येणार अहवाल हा अंतिम अहवाल असल्याने लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्‍याची शक्यता आहे.

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading