मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BREAKING सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दणका

BREAKING सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दणका

सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) मृत्यूप्रकरणी आणखी एक मोठी बातमी आली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) दणका बसला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 5 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) मृत्यूप्रकरणी अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मोठा दणका बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) रियाविरोधात समन्स बजावलं आहे. रियाच्या दोन मालमत्तांविषयी ED ने प्रश्न उपस्थित केले आहेत. 7 ऑगस्टला रियाला मुंबईत ED च्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी एकत्रितपणे काही कंपन्या आणि मालमत्ता विकत घेतल्या होत्या. यामध्ये रियापेक्षा सुशांतचेच पैसे अधिक होते, असे आरोप आहेत. ED ने नेमक्या कुठल्या मालमत्तांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रिया चक्रवर्तीच्या संपत्तीचा आणि मालमत्तेच्या स्पष्ट हिशोब नाही, हे यावरून उघड झालं आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI कडे दिली जाणार आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच अधिसूचना काढू शकतं. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रियाविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल.
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या