सुशांत प्रकरणातील मीडिया रिपोर्टिंग संदर्भात तिसरी याचिका, हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

सुशांत प्रकरणातील मीडिया रिपोर्टिंग संदर्भात तिसरी याचिका, हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका एनजीओने सुशांत सिंह प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका एनजीओने सुशांत सिंह प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये असे निवेदन करण्यात आले आहे की अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajpu) मृत्यूशी संबंधित घटनांबाबत रिपोर्टिंग करण्यापासून प्रसारमाध्यमांना थांबवले जावे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या 3 याचिका

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली ही तिसरी याचिका आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील पीठ यापूर्वी दोन याचिकांवर सुनावणी करत आहे. यापैकी एक याचिका चित्रपट निर्माते निलेश नवलखा आणि पुण्यात राहणाऱ्या दोघांनी दाखल केली आहे तर दुसरी याचिका बाहेरच्या राज्यातील आठ माजी पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे. न्यायालय आता या तीन याचिकांवर 8 ऑक्टोबर रोजी संयुक्त सुनावणी करणार आहे.

(हे वाचा-'जिस थाली में खाते है उसी में छेद', जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर निशाणा)

'इन पर्सूट ऑफ जस्टिस' या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या ताज्या याचिकेत अशी विनंती करण्यात आली आहे की, न्यायालयाने 'कोर्टाचा अवमान करण्यासंदर्भातील कायद्या'ची सीमा विस्तारीत करावी. ज्यामध्ये एफआयआर नोंदल्यापासून न्यायालयीन प्रशासनाच्या कामात अडथळ्यांना देखील यामध्ये समाविष्ट केले जावे. यामध्ये अशी विनंती देखील करण्यात आली आहे की, उच्च न्यायालयाने अर्जावर अंतिम निर्णय देईपर्यंत मीडियाला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास प्रतिबंधित केले जावे.

याचिकेत असे म्हटले आहे की, 'सुशांत सिंह राजपूतच्या अकाली मृत्यूबाबतीत होणारे मीडिया रिपोर्टिग त्याचप्रमाणे  त्या घटनेशी संबंधित सर्व मुद्दे व गैर-मुद्द्यांविषयी मीडियाचे वर्तन मोठ्या प्रमाणात त्रासदायक आहे. यामुळे मुक्त प्रेस आणि न्याय प्रशासन यांच्यात घटनात्मक संतुलन शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. ''

(हे वाचा-सामंथा अक्किनेनीने सारा अली खान आणि रकुल प्रीतला म्हटले Sorry, हे आहे कारण)

याचिकेत असेही म्हटले आहे की, प्रेसने सुशांतचे खाजगी चॅट, आरोपी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही निवदेन प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या अहवालामुळे पक्षकारांच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे आणि याचा प्रभाव या प्रकरणातील तपासावर होण्याची शक्यता आहे, असे देखील या याचिकेत म्हटले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 15, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या