Home /News /entertainment /

'सुशांतच्या आयुष्यातील सर्व मोठे निर्णय रिया घ्यायची', श्रुती मोदीचा ED समोर खुलासा

'सुशांतच्या आयुष्यातील सर्व मोठे निर्णय रिया घ्यायची', श्रुती मोदीचा ED समोर खुलासा

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)च्या अडचणी वाढत आहेत. सुशांतची बिझनेस मॅनेजर असणाऱ्या श्रुती मोदी हिने देखील रियाबाबत काही खुलासे केले आहेत.

    मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Death) 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि ईडी या सर्व संस्थांच्या तपासानंतरही अद्याप सुशांतच्या आत्महत्येचे मुळ कारण सापडले नाही आहे. मात्र याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)च्या अडचणी मात्र वाढत आहेत. सुशांतची बिझनेस मॅनेजर असणाऱ्या श्रुती मोदी (Shruti Modi) हिने देखील रियाबाबत काही खुलासे केले आहेत. याप्रकरणी ईडीने सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी केली. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार श्रुती मोदीने काही महत्त्वाचे खुलासे EDसमोर केले आहेत. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार श्रुती मोदीने तिच्या जबाबात असे म्हटले आहे की, तिने कधी बेकायदेशीर व्यवहार केला नाही. (हे वाचा-मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर) तिने दिलेल्या जबाबानुसार जेव्हापासून सुशांतच्या आयुष्यात रिया आली आहे तेव्हापासून त्याच्या आयुष्यातील सर्व मोठे निर्णय तिच घेत असे. श्रुतीने काही उदाहरणे देत ईडीला ही बाब सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे सुशांतचे प्रोफेशनल आणि आर्थिक निर्णयही रियाच घ्यायची अशी माहिती श्रुतीने दिली. मिळालेल्या माहितीनुसार श्रुती सुशांतची त्यावेळी बिझनेस मॅनेजर होती, जेव्हा रियाची आणि सुशांतची ओळख झाली होती. रियाचे काही बिझनेस प्रोजेक्ट्स देखील श्रुतीने सांभाळले होते. मात्र फेब्रुवारी 2020 नंतर सुशांत आणि श्रुती कमी वेळा भेटल्याचे तिने या जबाबात म्हटले आहे. (हे वाचा-SSR Death Case : नवे वळण, सुशांतच्या वडिलांचा रिया-श्रुतीला केलेला 'तो' मेसेज..) सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या