मुंबई, 30 सप्टेंबर- अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास अजून मोठ्या सतर्कतेने सुरु आहे. नुकताच मुंबईमधील वांद्रेच्या एका आलिशान हॉटेलचा मालक कुणाल जानीला (Kunal Jani) अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा सुशांत सिंह रजपूतचा मित्र होता. तसेच या ड्रग्स प्रकरणातील तो एक फरारी संशयित होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कुणालला अटक केली आहे.
Drugs cases related to the death of actor Sushant Singh Rajput | Narcotics Control Bureau (NCB) arrested hotelier Kunal Jani (in file pic) from Mumbai's Khar area. He was a close friend of Rajput and was absconding. pic.twitter.com/lqTPa7l5Ye
— JK Media (@jkmediasocial) September 30, 2021
गेल्यावर्षी जूनमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला होता. तसेच बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनसुद्धा उघड झालं होतं. यामध्ये अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली होती. तर काहींना अटकदेखील झाली होती.
यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि भावाचासुद्धा समावेश होता. या प्रकरणामध्ये एका आलिशान हॉटेलचा मालक आणि सुशांत सिंह रजपूतचा मित्र कुणाल जानीचीसुद्धा चौकशी झाली होती. यावेळी NCB ला कुणालवीरुष काही पुरावे हाती लागले होते. कुणालही त्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी होता ज्यामध्ये रिया चक्रवर्ती होती. यामध्ये हे लोक ड्रग्सबद्दल संवाद करत असल्याचं आढळलं होतं, त्यामुळे ईडीने कुणालची तब्बल ६ तास चौकशी केली होती. कुणाल या प्रकरणानंतर फरार झाला होता. मात्र आज अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sushant sing rajput