सुशांतच्या बँक खात्यात होते 70 कोटी, फॉरेन्सिक ऑडिटमधून रियाबाबत मोठा खुलासा

सुशांतच्या बँक खात्यात होते 70 कोटी, फॉरेन्सिक ऑडिटमधून रियाबाबत मोठा खुलासा

गेल्या 5 वर्षामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या खात्यामध्ये 70 कोटी रुपये होते. मुंबई पोलिसांनी समोर आणलेल्या त्याच्या बँक खात्याच्या ऑडिट अहवालानुसार तो रियावर खूप खर्च करत असे. मात्र त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झाले नाही आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) मनी लाँड्रिंगचा आरोप केला जात आहे. सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी देखील अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) तिने सुशांतचे पैसे लाटल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचा (Mumbai Police) फॉरेन्सिक ऑडिट अहवाल ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सोपवला आहे. यामधून काही मोठे खुलासे झाले आहेत. ग्रांट थॉर्टन या कंपनीच्या ऑडिट अहवालानुसार सुशांत रिया आणि तिच्या कुटुंबावर पैशांची उधळपट्टी करत असल्याचे समोर येत आहे. मात्र त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झाले नाही आहे.

गेल्या 5 वर्षामध्ये सुशांतच्या खात्यामध्ये 70 कोटी रुपये होते. त्यातीलच रक्कम खर्च झाली आहे. त्याने बरीचशी रक्कम संपत्ती, लक्झरी कार्स आणि बाईक खरेदी करण्यासाठी वापरली. त्याचप्रमाणे त्याच्या अपार्टमेंटचे भाड्यासाठी देखील काही पैसे खर्च झाले. याबरोबर सुशांतने कोट्यवधी रुपये एफडी आणि म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. या अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की त्याने मोठी रक्कम केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देखील दान दिली होती.

(हे वाचा-SSR Case: गौरव आर्य ईडीसमोर राहणार हजर,ड्रग डीलिंगबाबत धागेदोरे मिळण्याची शक्यता)

दरम्यान या ऑडिट अहवालानुसार सुशांतच्या बँक खात्यातील जवळपास 50 लाख रुपये रिया आणि तिच्या भावासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये युरोप टूर, शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बूकिंगचा समावेश आहे. मात्र सुशांतकडून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारच इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण झाले नाही.

(हे वाचा-भाजपचे संदीप सिंह कनेक्शन? 'त्या' करारावरून सचिन सावंत यांनी पुन्हा केलं लक्ष्य)

त्याप्रमाणे सुशांतने काही प्रोडक्शन हाऊस, एजन्सीज आणि काही कंपनीना देखील मोठी रक्कम देऊ केली आहे. सुशांतने एवढी रक्कम का देऊ केली याची देखील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान या कंपन्यांचा आणि रियाचा काही संबंध आहे की नाही याची तपासणी ईडी आणि सीबीआय करणार आहेत

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 30, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या