फक्त विश्वास तुटू देऊ नका! सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची प्रेरणादायी पोस्ट

फक्त विश्वास तुटू देऊ नका! सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची प्रेरणादायी पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूबाबत एम्सने आपला रिपोर्ट सीबीआयला दिल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita lokhande) ही नवी पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant singh rajput) हत्या नव्हे तर त्याने आत्महत्या केली आहे, असा रिपोर्ट एम्सने (AIIMS) सीबीआयला (CBI) दिला. या रिपोर्टबाबत सुशांतच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचं कुटुंब याबाबत समाधानी नाही. मात्र आपण जिंकू असा विश्वासही सुशांतच्या कुटुंबाला आहे. असाच विश्वास सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील (Ankita lokhande) व्यक्त केला आहे. फक्त हा विश्वास तुटू देऊ नका असं तिनं म्हटलं आहे.

सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण समोर यावं यासाठी अंकितालादेखील वाटतं. सुशांतच्या कुटुंबाच्या पाठिशी ती खंबीरपणे उभी राहिली आहे. सुशांतला न्याय मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रत्येक मोहिमेत ती सहभागी असते. सध्या अंकिताचे वडील आजारी आहेत. अशा परिस्थितीतही अंकिता खचली नाही आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने स्वामी समर्थांचा उल्लेख केला आहे.

View this post on Instagram

Shree swami samartha🙏🏻

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'कधी कधी आयुष्यामध्ये खूप दु:ख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? इथवर शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परिक्षेची असते. विश्वास ठेवा इथून स्वामी लिला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका.

सुशांतने आत्महत्या केली, असा रिपोर्ट एम्सने दिल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने याआधी प्रतिक्रिया दिली होती. फक्त दोन शब्दांमध्ये तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. श्वेता म्हणाली, "आम्ही जिंकणार". इतक्या महिन्यांपासून भावासाठी लढाई लढणाऱ्या श्वेताला आपल्या भावाला न्याय मिळेल असा विश्वास कायम आहे.

हे वाचा - "सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

सुशांतने आत्महत्या केली असा रिपोर्ट देणाऱ्या एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. यामध्ये सुशांतची हत्या झाली असं सांगितलं जातं आहे. ही ऑडिओ क्लिप एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता (Dr Sudhir gupta) यांची असल्याची सांगितली जाते आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिलं. यानंतर सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

हे वाचा - सुशांत सिंह प्रकरणात सर्वच शक्यतांचा तपास, AIIMSच्या अहवालानंतर CBIचं वक्तव्य

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआय सर्वच शक्यतांचा तपास अतिशय काळजीपूर्वक करत असल्याचं मत सीबीआयच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे. एम्सच्या रिपोर्टशिवाय सीबीआय सीएफएसएल आणि एफएसएल रिपोर्ट्सचाही समावेश आहे. हे तिन्ही रिपोर्ट सुशांतच्या आत्महत्येचे संकेत देत आहे. शिवाय सीबीआय आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या अँगलनेही तपास करत आहे.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या