Chhichhore Trailer 2 : हॉस्टेलमधील मस्ती आणि दोस्तीची दमदार केमिस्ट्री

हा ट्रेलर पहिल्यावर तुम्हालाही तुमच्या कॉलेजचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 04:33 PM IST

Chhichhore Trailer 2 : हॉस्टेलमधील मस्ती आणि दोस्तीची दमदार केमिस्ट्री

मुंबई, 23 ऑगस्ट : दंगल सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आता आणखी एक नव्या ढंगाचा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘छिछोरे’ मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. यामध्ये कॉलेज लाइफ दाखवण्यात आली आहे. हा ट्रेलर पहिल्यावर तुम्हालाही तुमच्या कॉलेजचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.

कॉलेज लाइफमधील मैत्रीवर आधारित या सिनेमच्या ट्रेलरमध्ये सुशंत सिंग राजपूत आणि वरुण शर्मा मस्ती करताना दिसत आहे. जवळपास 2 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मुलांची हॉस्टेल लाइफ दाखवण्यात आली आहे. ज्यात कॉलेज स्टुडंटचं एकमेकांवर पाणी फेकणे, फटाके फोडणे, एकमेकांना डिस्टर्ब करणे आशाप्रकारच्या गोष्टी दाखवण्यात आला आहेत. मात्र या संपूर्ण सिनेमात सुशांत आणि वरुण यांच्या भूमिका खूपच इंटरेस्टिंग वाटतं. हॉस्टेलमध्ये हे दोघंच खूप जास्त प्रॅन्क करताना दिसतात.

'उरी'नंतर आता बालाकोटवर होणार सिनेमाची निर्मिती, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत

या अगोदर रिलीज झालेल्या पहिल्या ट्रेलरमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूरची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. मात्र सुशांत सिंग राजपूत आणि वरुण शर्मा यांच्यातील निखळ मैत्री दाखवण्यात आली आहे. या सिनेमाच्या टायटलबाबत बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक नितेश सांगतात, जर तुम्ही तुमचं कॉलेजला असताना हॉस्टेलमध्ये राहिला असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांशी डील केलं असेल तर तुम्ही हे जास्त समजून घेऊ शकता.

Loading...

मृत म्हणून कचऱ्यात फेकलेली 'ती' आज बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसून खेळतेय KBC

प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रकारचं छिछोरपणा नक्कीच असतो. फक्त हे तुमच्यावर अवलंबून असतं कि, त्याचा वापर तुम्ही सकात्मक करता की नकारात्मक. सर्वच मित्र जवळापास असेच असतात. ते कितीही मोठे झाले तरीही त्यांचे स्वभाव बदलत नाहीत. नितेश तिवारी यांनी हा सिनेमा स्वतःच्या पर्सनल लाइफला करुन तयार केला आहे. अनेकांनी या ट्रेलरची तुलना ‘3 इडियट्स’ सोबत केली आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांची असून हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूड पदार्पणाआधी हॉटेलमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री

===========================================================

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...