'पवित्र रिश्ता 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मात्र सुशांतच्या आठवणीने चाहते झाले भावुक

'पवित्र रिश्ता 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला,  मात्र सुशांतच्या आठवणीने चाहते झाले भावुक

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि सुशांतसिंग राजपूतने (Sushant singh Rajput) यामध्ये उत्तम अभिनय केला होता.

  • Share this:

मुंबई, 12 मे-  छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि सुशांतसिंग राजपूतने (Sushant singh Rajput) यामध्ये उत्तम अभिनय केला होता. या मालिकेमुळेच सुशांत आणि अंकिता घराघरात पोहचले होते. या मालिकेमधील त्यांनी साकारलेल्या ‘अर्चना आणि मानव’ (Archana-Manav) या जोडीला प्रेक्षकानंच भरभरून प्रेम मिळालं होतं. यातूनचं त्यांची रिअल लाईफ केमेस्ट्री सुद्धा लोकांना पाहायला मिळाली होती.

आत्ता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ वर पुनरागमन करणार आहे. गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं. आणि त्यानंतर या मालिकेबद्दल जोरदार चर्चा झाली होती. शो मेकर्स या मालिकेच्या दुसऱ्या भागावर काम करणार असल्याच्या चर्चा सुद्धा सुरु होत्या.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये अर्चनाची भूमिका पुन्हा एकदा अभिनेत्री अंकिता लोखंडेचं साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ठिकाणी मानव म्हणून दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्यापही कोणत्याच अभिनेत्यांचं नाव समोर आलेलं नाही.

(हे वाचा: अगं बाई.. अरेच्चा! केदार शिंदे लग्नानंतर 25 वर्षांनी पुन्हा अडकले विवाह बंधनात  )

‘पवित्र रिश्ता’ ही एक कौटुंबिक मालिका होती. आपल्या कौटुंबिक वादात या दोघांच असणारं निखळ प्रेम प्रेक्षकांना भुरळ घालत होतं.  यामध्ये सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर आपली एक छाप पाडली आहे. त्यामुळे आत्ता त्याच्या जागी जो कोणताही अभिनेता घेण्यात येईल, त्यामध्ये चाहते सुशांतचाचं शोध घेताना दिसतील. त्यामुळे ही भूमिका साकारण आत्ता कोणत्याही अभिनेत्यासाठी एक मोठं आव्हान आहे.

(हे वाचा: 'तारक मेहता'च्या अभिनेत्रीला VIDEO भोवला; दलित समुदायाबद्दल वापरला चुकीचा शब्द)

तसेच अंकिताला सुद्धा या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर अंकिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तिने मनिकार्निका आणि बागी 3 सारख्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. यावेळी ‘पवित्रा रिश्ता 2’ चाहत्यांना ओटीटी वर पाहायला मिळणार आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 12, 2021, 7:43 PM IST

ताज्या बातम्या