S M L

सुशांतनी नाकारली फेअरनेस क्रिमची जाहिरात; 15 करोडची होती ऑफर

अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या जोरदार चर्चेत आहे कारण त्यांने 15 करोडची फेअरनेस जाहिरात करण्यास नकार दिला. पण का?

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 06:02 PM IST

सुशांतनी नाकारली फेअरनेस क्रिमची जाहिरात; 15 करोडची होती ऑफर

13 जानेवारी : अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या जोरदार चर्चेत आहे कारण त्यांने 15 करोडची फेअरनेस जाहिरात करण्यास नकार दिला. पण का? असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांनाही पडला आहे. पण ही जाहिरात न करण्यामागे सुशांतचे विचार काही वेगळे आहेत. सुशांत म्हणतो की, 'अशा फेअरनेस क्रिमसारख्या जाहिराती केल्याने आणि त्यांना प्रमोट केल्याने समाजात चुकीचा संदेश पसरतो. कोणत्याही वस्तूला घेवून समाजात चुकीचे संदेश न पसरवणं ही प्रत्येक अभिनेत्याची जबाबदारी आहे.'

बॉलिवूड कलाकारांच्या फेअरनेस जाहिराती करण्यावर अभिनेता अक्षय देओल घेतलेला आक्षेप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि यालाच प्रतिसाद देत सुशांत सिंगनं फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास नकार दिला आहे.

हो खरं तर आताच्या काळात 15 करोड रुपयांच्या जाहिरातीला नकार देणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. पण सुशांतचा हा निर्णय समाजात चांगला संदेश देईल हे नक्की. त्यामुळे त्याच्या या निर्णयाचं त्याच्या चाहत्यांकडून स्वागत होतं आहे. पण मंडळी आता नकार दिलेली जाहिरात कोण करणार यावरही सगळ्यांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 06:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close