दिवाकर सिंह/ नवी दिल्ली, 14 एप्रिल : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास
(Sushant singh rajput drugs case) करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला
(NCB) मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील दुबई कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणजे ड्रग्ज तस्करांचा म्होरक्या साहिल शाह उर्फ फ्लॉकोची ओळख उघड झाली आहे.
एनसीबीने गेल्या रात्री मालाडमधील एका इमारतीवर धाड टाकली. हा फ्लॅट फ्लॉकोचाच असल्याचं समजलं. या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात अमेरिकी ड्रग्ज सापडले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समीर वानखेडे यांनी सांगितलं, मालाडच्या ज्या फ्लॅटवर छापेमारी करण्यात आली, त्या इमारतीत सुशांत सिंह राजपूत आधी राहत होता. आम्ही आता साहिल फ्लॉकोची ओळख पटवली आहे आणि आता लवकरच त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यानंतर या प्रकरणात मोठे खुलासे होतील.
हे वाचा - Nyay The Justice : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्मचा टिझर; उलगडणार अनेक 'राज'
फ्लॉको हा दुबईत बसून आपल्या ड्रग्ज तस्करांमार्फत बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील हाय प्रोफाइल लोकांना ड्रग्ज सप्लाय करायचा.
फ्लॉको ही तीच व्यक्ती आहे, जिचा चेहरा आजपर्यंत कोणत्याच ड्रग्ज तस्करने किंवा नार्कोटिक्स एजन्सीने पाहिला नव्हता.
त्यामुळेच सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयिताचा गेल्या 6-7 महिन्यांपासून एनसीबीला पत्ता लागत नव्हता. पण ड्रग्ज तस्कर अब्बास आणि जैर यांच्यामार्फत मिळालेल्या धाग्यांआधारे त्याच दिशेने एनसीबीने तपास सुरू ठेवला. अखेर पुरावे आणि ड्रग्ज तस्करांमार्फत फ्लॉकोची ओळख पटली.
हे वाचा - सुपरहिट अन्नियनचा येतोय रिमेक; हा बॉलिवूड अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
इतकंच नव्हे तर दुबईत राहून भारतात ड्रग्ज पाठवणाऱ्याची त्याची मोडेस ओपेरंडीचा पर्दाफाश केला आहे. सांताक्रुझ परिसरात छापा टाकून अॅडॉल्फ हिटलरच्या पुस्तकातून केल्या जाणाऱ्या ड्रग्ज तस्करीचाही पर्दाफाश केला आहे. इथल्या एका कुरिअर कंपनीवर छापा टाकला आणि तिथचं या ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाला. हे सर्व साहिलच्या डोक्यातून सुरू होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.