मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं; जवळील नातेवाईक NCB च्या ताब्यात

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं; जवळील नातेवाईक NCB च्या ताब्यात

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 18 ऑक्टोबर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात (Sushant Singh Rajput Drug Case) अर्जुन रामपाल यांच्या जवळील व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव एगीसलोस डेमेट्रिडेस (Agisilaos Demetriades) असं आहे. तो अर्जुल रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ आहे. NCB सूत्रांनुसार एगीसलोस डेमेट्रिडेस याच्या जवळ चरस आणि Alprazolam टॅबलेट सापडली आहेत. एगीसलोस डेमेट्रिडेस याला व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करण्यात आलं. यानंतर त्याला दोन दिवसांच्या NCB कस्टडीमध्ये पाठविण्यात आलं आहे. बॉलिवूड ड्रग्स रॅकेट प्रकरणात ही 23वी अटक आहे. यापूर्वी 21 नंबरचे आरोपी क्षितिज प्रसादचे जवळचे जय मधोक याला अटक करण्यात आली होती. हे ही वाचा-मोठी बातमी! ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉयच्या अडचणीत वाढ, CCB करणार पत्नीची चौकशी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput) ड्रग्सचा पैलू समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या तपासात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty Bail Order) हिला 7 ऑक्टोबर रोजी साधारण 1 महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. रियाला एनसीबीने 9 सप्टेंबर रोजी अटक केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणात 29 सप्टेंबर रोजी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची जामीन खाचिका फेटाळण्यात आली आहे. कोर्टाने सांगितले की, रियावर कोणताही गुन्हा होत नाही, कारण ती कोणत्याही ड्रग्ज सिंडिकेटचा भाग नव्हती. दरम्यान दुसरीकडे अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या (Vivek Oberoi) च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कर्नाटक पोलिसांनी विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला नोटीस पाठवली आहे. बेंगळुरू सीसीबीने (Bangalore Central Crime Branch) विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा हिला (Priyanka Alva Oberoi) समन धाडले आहेत. ड्रग प्रकरणातील केसमध्ये प्रियांकाला 20 ऑक्टोबर रोजी चौकशीकरता हजर राहण्यासाठी हे समन बजावण्यात आले आहेत. बेंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रँचने मंगळवारी विवेक ऑबेरॉयच्या घरावर छापा टाकला होता.
First published:

Tags: Bollywood, Sushant sing rajput

पुढील बातम्या