Home /News /entertainment /

"सुशांतच्या हत्याकांड तपासाची चेष्टा करणं बंद करा", मुंबई पोलिसांवर भडकली कंगना रणौत

"सुशांतच्या हत्याकांड तपासाची चेष्टा करणं बंद करा", मुंबई पोलिसांवर भडकली कंगना रणौत

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येप्रकरणी सातत्याने बॉलिवूडवर आरोप करणाऱ्या कंगना रणौत (kanagan ranaut) आता मुंबई पोलिसांवरही संताप व्यक्त केला आहे.

    मुंबई, 26 जुलै :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस (mumbai police) तपास करत आहेत. वांद्रे पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. अभिनेत्री कंगना रणौतलाही (kanagna ranaut) पोलिसांनी समन्स जारी केला आहे. मात्र यानंतर करण जोहरऐवजी (karan johar) त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवल्याने कंगना भडकली आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलसांनी करण जोहरऐवजी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. यावरून कंगना संतप्त झाली आहे. सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणं बंद करा, असं तिनं मुंबई पोलिसींना म्हटलं आहे. संतप्त झालेल्या कंगनाने ट्वीट केलं आहे. कंगनाच्या टीमने केलेल्या ट्वीममध्ये म्हटलं आहे, "करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणं बंद करा" "समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाचा सर्वात चांगल्या मित्राच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?", असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - मोठी बातमी! सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील बड्या दिग्दर्शकाची चौकशी सुशांतने मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरी 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत 37 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचं सांगितलं. आता कंगना रणौत, महेश भट्ट यांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. जर गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असं देशमुख म्हणाले. हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची मागणी; पंतप्रधान मोदींनी घेतली दखल दरम्यान कंगनाला पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी सहकार्य करण्याची तयारी तिने दर्शवली आहे. कंगनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांना पत्र दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने कंगना रणौत यांना वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये 27 जुलैपर्यंत निवेदन देण्यास सांगितले आहे. आणि कंगना हिमाचल प्रदेश मध्ये असल्याने मुंबई पोलीस तिला तिथे भेटायला येऊ शकतात किंवा ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिचा जबाब नोंदवू शकते, असं या पत्रात म्हटलं आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ती मुंबईत चौकशीला येण्यासाठी तयार नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Kangana ranaut, Karan Johar, Mumbai police, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या