"रियाने सुशांतचा छळ केला", एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही सोडलं मौन

सुशांतच्या कुटुंबानंतर आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेही रियावर आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushsnat singh rajput) मृत्यूप्रकरणी इतके दिवस शांत राहिलेल्या त्याच्या कुटुंबाने थेट गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप केल्यानंतर आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही (ankita lokande) खळबळजनक आरोप केला आहे. रिया आपला छळ करत असल्याचं सुशांतने आपल्याला सांगितलं होतं, असं अंकिता लोखंडे म्हणाली आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहारमधील पाटणा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता लोखंडेने रियाबाबत सुशांतसह झालेल्या आपल्या संवादाचे मेसेज शेअर केलेत.

मणिकर्णिका फिल्मच्या प्रमोशनवेळी अभिनंदनासाठी सुशांतने अंकिताला मेसेज केला होता. त्यावेळी दोघांमध्ये बरंच बोलणं झालं.  अंकिताला केलेल्या मेसेजमध्ये सुशांतने आपण रियासह रिलेशनशिपमुळे त्रस्त असल्याचं सांगितलं. त्याला हे नातं संपवायचं होतं, कारण रिया त्याचा खूप छळ करत होती.आता या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे वाचा - "सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच", पुराव्यानिशी कंगनाने केले खळबळजनक आरोप

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा सर्वात जास्त धक्का अंकिता लोखंडेला बसला. ती सोशल मीडियापासून दूर होती आणि आता रिया चक्रवर्तीवर आरोप लावल्यानंतर तिनंही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.  'सत्याचा विजय होतो', इतकंच सूचक ट्वीट तिनं केलं.

यााधी सुशांतच्या मृत्यूला महिना झाल्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर देवासमोर दिवा लावल्याचा फोटो शेअर केला होता. त्याला CHILD OF GOD असे कॅप्शन दिले होते. त्याचप्रमाणे तिने 'दिल बेचारा'च्या प्रदर्शनाआधी देखील एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते.

सुशांतच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी अंकिताने मुंबईतील त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर ती सोमवारी पहिल्यांदाच दिसली. घराबाहेर पडून तिनं गरीब लहान मुलांना चॉकलेट्स वाटले.

हे वाचा - सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर दिसली EX-गर्लफ्रेंड अंकिता

पवित्र रिश्ता मालिकेतून मानव-अर्चना म्हणून पडद्यावर हिट ठरलेली ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही लोकांच्या पसंतीला उतरली. सुशांत-अंकिता रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांचे चाहतेही नाराज झाले.  अंकिताने सुशांतसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. त्याच्या आईची जागा घेतली होती. अंकिता सर्वकाही सुशांतच्या आवडीचे करत असे. सुशांतसाठी ती करिअर सोडायला देखील तयार होती, असं अंकिता आणि सुशांत या दोघांचाही मित्र संदीपने याआधी सांगितलं होतं.

Published by: Priya Lad
First published: July 29, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या