मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"सुशांतच्या बहिणीने नशेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता", रिया चक्रवर्तीचा खळबळजनक आरोप

"सुशांतच्या बहिणीने नशेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता", रिया चक्रवर्तीचा खळबळजनक आरोप

रिया चक्रवर्तीने (rhea chakaraborty) सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) कुटुंबाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

रिया चक्रवर्तीने (rhea chakaraborty) सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) कुटुंबाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

रिया चक्रवर्तीने (rhea chakaraborty) सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) कुटुंबाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput प्रकरणात त्याच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर आरोप लावले आहेत. तर आता रियानेदेखील त्याच्या कुटुंबाबाबत अनेक धक्कादायक असे खुलासे केले आहेत. रियाने सुशांतची बहीण प्रियांकावर (Sushant's sister Priyanka) खळबळजनक असा आरोप केले आहे.

सुशांतची बहीण प्रियंकाने आपल्याला नशेत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. असा आरोप रियाने आपलं स्टेटमेंट देताना केला आहे.

रियाने सांगितलं, "सुशांत आणि तिच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर ती जेव्हा सुशांतच्या घरी गेली तेव्हा त्याची बहीण प्रियांका आणि तिचा पती सिद्धार्थ सुशांतसह राहत होते. एप्रिल 2019 मध्ये एका रात्री रिया आणि प्रियंका एका पार्टीला एकत्र गेले होते. तिथं प्रियंका भरपूर दारू प्यायली. त्यानंतर ती पुरुष आणि स्त्रियांसह असामान्य असा व्यवहार करत होती"

हे वाचा - आदित्य ठाकरेंशी भेट झाली होती का? सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीचा खुलासा

रियाने तिला आपण सुशांतच्या घरी परत जाऊ असंही सांगितलं. मात्र तरीदेखील प्रियंका दारू पित राहिली आणि दुसऱ्या दिवशी शूटवर जायचं असल्याने रिया घरी परतली.

रिया म्हणाली, "मी सुशांतच्या खोलीत झोपले होते आणि अचानक जाग आली कारण प्रियांका माझ्या बाजूला झोपली होती आणि ती मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. मी तिला रागात खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर सुशांतच्या घरातून मी स्वत: निघून गेले"

हे वाचा - "सरकारने करणचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा", पुन्हा भडकली कंगना रणौत

रियाने ही गोष्ट आपण सुशांतलाही सांगितलं, ज्यामुळे त्याचं बहिणीसोबत भांडण झालं आणि यानंतर त्याच्या कुटुंबासह आपलं नातं बिघडल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळेच सुशांतच्या अंत्यसंस्काराच्या यादीतील 20 लोकांमध्ये माझं नाव नव्हतं, त्यामुळे मी अंत्यसंस्कारात जाऊ शकले नाही, असंही ती म्हणाली.

First published:

Tags: Sushant Singh Rajput