आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर काय केलं होतं सर्च? समोर आला मोबाइलचा फॉरेन्सिक रिपोर्ट

आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर काय केलं होतं सर्च? समोर आला मोबाइलचा फॉरेन्सिक रिपोर्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येप्रकरणी तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे. तर सुशांतच्या आत्महत्येला बॉलीवूड नेपोटिझम कारणीभूत असल्याचा आरोप केला जात. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 26 जणांचा जबाब नोंदवला आहे. तर आता सुशांतच्या मोबाइलचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे.

सुशांतच्या मोबाइलच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सुशांतने आत्महत्येपूर्वी स्वत:ला गुगल (google) सर्च केलं होतं आणि स्वत:बाबत आर्टिकल्स वाचले होते. झी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. यातून सुशांत आपलं करिअर आणि इमेजबाबत चिंतेत होतात, असं समोर येतं आहे. पोलीस तपासात हा महत्त्वाचा धागा ठरू शकतो. रिपोर्टनुसार, आत्महत्येपूर्वी जवळपास 10 वाजता सुशांतने गुगलवर स्वत:ला सर्च केलं.

सुशांतच्या मृत्यूपूर्वीच विकिपीडियावर अपडेट?

दरम्यान 14 जूनच्या सकाळी 9 ते 9.30 यादरम्यान सुशांतचा विकिपीडिया पेज अपडेट झाला होता. यामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याची बाब अपडेट करण्यात आली आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येची बाब 14 जून दुपारी 1 वाजता समोर आली. सुशांतचे चाहते सोशल मीडियावरील तो आयपी अड्रेसही शेअर करीत आहेत. यामध्ये सुशांतचा विकिपीडिया अपडेट झाला होता. विशेष म्हणजे ही अपडेट सकाळी 9.08 मिनिटांनी करण्यात आल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शक्यता वर्तवत सुशांतच्या चाहत्यांनी अमित शहा यांच्याकडे सीबीआयची मागणी केली आहे.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची लव्हस्टोरी; UNSEEN VIDEO रिलीज

14 जून रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. पोलीस तपासात सुशांत 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी सुशांतच्या डॉक्टरांचीही चौकशी केली. सुशांतच्या काही जवळच्या व्यक्तींनीही तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती दिली. याशिवाय सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र महेश शेट्टी, सुशांतचा स्टाफ आणि घरात काम करणाऱ्यांचीही चौकशी झाली आहे. वेगवेगळ्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत.

संपादन - प्रिया लाड

First published: July 2, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading