Home /News /entertainment /

'दिल बेचारा'च्या शूटच्या शेवटच्या दिवशी कसा होता सुशांत सिंह राजपूत? VIDEO VIRAL

'दिल बेचारा'च्या शूटच्या शेवटच्या दिवशी कसा होता सुशांत सिंह राजपूत? VIDEO VIRAL

सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) शेवटचा चित्रपट दिल बेचारा ((dil bechara) 24 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे.

  मुंबई, 08 जुलै : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) शेवटचा चित्रपट दिल बेचारा (dil bechara) 24 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे. प्रत्येकाला या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अशात आता सुशांच्या या शेवटच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल होतो आहे. शेवटच्या चित्रपटाचं पॅकअप झाल्यानंतर सुशांतच्या चेहऱ्यावर कोणत्या भावना होत्या, हे या व्हिडीओतून दिसून येतं आहे. सुशांत सिंह राजपूतचा हा व्हिडीओ फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे, दिल बेचारा चित्रपटाच्या शूटनंतर सेटवर आपल्या चाहत्यांना भेटतानाचा हा सुशांतचा व्हिडीओ आहे, असं त्यांनी सांगितलं. आपल्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सुशांत यामध्ये खूप आनंदी दिसतो आहे.
  सुशांतचे शेकडो चाहते सेटवर त्याची वाट पाहत होते. सुशांत समोर येताच ते त्याच्या दिशेने धावत जातात. सुशांतही आपल्या चाहत्यांसमोर हात जोडतो, त्यांना फ्लाइंग किस देतो. चाहत्यांचं सुशांतवर आणि सुशांतचंही चाहत्यांवर तितकंच असलेलं हे प्रेम पाहून सुशांतच्या आठवणीत पुन्हा गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. सुशांतचे चाहते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा इमोशनल झालेत. तशाच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी दिल्या आहेत. हे वाचा - सुशांत सिंह राजपूतची कार्बन कॉपी आहे हा तरुण, विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO सुशांतसह या व्हिडीओत दिल बेचारा चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबराही आहेत. विशेष म्हणजे छाबरा यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतला 'काय पो छे' या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती, हा सुशांतचा पहिला चित्रपट. तर दिल बेचारा हा मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट. 24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant sing rajput

  पुढील बातम्या