• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • "Bullywood मधील कचराही साफ होईल", रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर कंगनाचं खळबळजनक विधान

"Bullywood मधील कचराही साफ होईल", रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर कंगनाचं खळबळजनक विधान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं (rhea chakraborty) ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) बॉलिवूडमधील ए लिस्टर सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborty) ईडी, सीबीआयनंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) एफआयर दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीत रियाचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे आणि त्यामुळे आता एनसीबीदेखील (NCB) तपास करणार आहे. यावरून अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर येताच तिला सर्वांनी पुन्हा लक्ष्य केलं. यावर कंगनानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने याबाबत ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं थेट कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र बॉलिवूडला बुलीवुड म्हणत अनेक सेलिब्रिटीजना ड्रग्जवरून तिनं लक्ष्य केलं आहे. कंगना म्हणाली, "जर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुलीवूडमध्येही तपास केला, तर कित्येक ए लिस्टर सेलिब्रिटी बारमध्ये दिसतील. रक्तचाचणी झाली तर अनेक धक्कादायक खुलासे होतील. पीएमओ इंडिया अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेत बुलीवूडमधील कचराही साफ होईल, अशी आशा आहे" हे वाचा - सुशांत आणि रियाला ‘ड्रग्ज’चा पुरवठा, पुरावे मिळाल्याच्या दाव्याने खळबळ सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. ईडीने एनसीबीला पाठवलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. त्यानंतर रिया विरुद्ध  कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाचा - अभिनेत्री तमन्नाच्या घरात कोरोनाचा शिरकाव; म्हणाली, "दुर्दैवाने माझे पालक..." यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. या चॅटमध्ये रियाने गौरव आर्या, सॅम्युअल मिरांडा आणि जया साहासह बातचित केली आहे. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: