अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत पुन्हा येतायत एकत्र

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत पुन्हा येतायत एकत्र

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या नावाची खूप चर्चा होती. पवित्र रिश्ता मालिकेतून दोघंही घराघरात पोचले. अर्चना-मानव सगळ्यांच्या आयुष्याचा भागच बनले.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या नावाची खूप चर्चा होती. पवित्र रिश्ता मालिकेतून दोघंही घराघरात पोचले. अर्चना-मानव सगळ्यांच्या आयुष्याचा भागच बनले. या मालिकेमुळेच दोघांचं प्रेम बहरत गेलं होतं. दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले होते. आता ते लग्न करणार अशी बातमी आली. आणि अचानक दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सुशांत सिंग आणि कृती सनाॅनचंही सूत जुळलं होतं.

आता बातमी वेगळी आलीय. अंकिता आणि सुशांत पुन्हा एकदा एकत्र येतायत. तेही छोट्या पडद्यावर. खास लोकाग्रहास्तव पवित्र रिश्ता आणि जोधा अकबर या दोन मालिका पुन्हा एकदा दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे अर्चना आणि मानव पुन्हा तुम्हाला भेटणार आहेत.

अंकिता लोखंडे सध्या खूप खूश आहे. कारण तिची बाॅलिवूड एन्ट्री होतेय.  अंकिता मणिकर्णिका सिनेमात झलकारीबाईच्या भूमिकेत आहे. झाशीच्या राणीसोबत झलकारी बाई असायच्या. राणीसाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली. अंकितानं संजय दत्तसोबतही एक सिनेमा साईन केलाय.

सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेनाॅन यांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. पण सध्या त्या दोघांनी सध्या ब्रेक घ्यायचं ठरवलंय. सुशांत सध्या किजी और मॅनी सिनेमात बिझी आहे. तर कृती लंडनला हाऊसफुल 4मध्ये बिझी आहे. दोघांनी सध्या रिलेशनशिपमध्ये ब्रेक घ्यायचं ठरवलं.

राब्ताच्या सेटवर सुशांत आणि कृतीची जवळीक वाढली. कृतीमुळेच सुशांतनं अंकिताला सोडलं. सध्या तरी दोघं आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करणार आहेत.

ते काहीही असलं, तरी फॅन्ससाठी मानव आणि अर्चना पुन्हा एकत्र येणार, हे नक्की.

PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?

First published: September 2, 2018, 4:50 PM IST

ताज्या बातम्या