सुशांत सिंग राजपूत आणि कृतीच्या नात्यावर मोहोर

सुशांत सिंग राजपूत आणि कृतीच्या नात्यावर मोहोर

सुशांत सिंग राजपूत आणि कृती सनॉन या जोडीची 'राबता'या सिनेमासाठी निवड करण्यात आली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार खऱ्या आयुष्यातही या जोडीमध्ये काही नातं असल्याची चर्चा सुरु आहे.

  • Share this:

23 नोव्हेंबर :  सुशांत सिंग राजपूत आणि कृती सनॉन या जोडीची 'राबता'या सिनेमासाठी निवड करण्यात आली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार खऱ्या आयुष्यातही या जोडीमध्ये काही नातं असल्याची चर्चा सुरु आहे. यांच्या नात्याबद्दल मीडियात खूप चर्चा आहे पण ते दोघे मात्र याला नकार देत आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असंच म्हणत आहेत.

आता नुकताच फराह खानच्या घरी एड शीरनसाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ज्यात सुशांत आणि कृतीदेखील होती. या कार्यक्रमासाठी ते दोघेही सोबत आले आणि सोबतच घरी गेले त्यामुळे त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना आणखीनच रंग चढला.

एका स्पॉटबॉयच्या माहितीनुसार 'राबता' सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांना नेहमी एकत्र फिरावं लागायचं. पण ते असेही लोकांसमोर अगदी सहज एकत्र फिरतात.

ते काहीही असो ते एकत्र फिरतात तेव्हा खरंच त्यांचा जोडा शोभून दिसतो आणि त्यांनीही हलक्या इशाऱ्यात मीडियाला त्यांच्या नात्याबद्दलची कबुली दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडला आता आणखी एक 'लव कपल' मिळालं असं म्हणायला हरकत नाही.

First published: November 23, 2017, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading