Home /News /entertainment /

रिया चक्रवर्ती भोवती फास आणखी घट्ट, NCB कडून समन्स

रिया चक्रवर्ती भोवती फास आणखी घट्ट, NCB कडून समन्स

रियाच्या अडचणी वाढल्या असून तिलाही या प्रकरणात अटक होणार का?

    मुंबई, 06 सप्टेंबर : सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि नोकर सॅम्युल मिरांडाला NCB नं अटक केली असून 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स विभागाकडे कोठडी देण्यात आली आहे. यामुळे रियाच्या अडचणी वाढल्या असून तिलाही या प्रकरणात अटक होणार का? हे पाहाणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. रिया चक्रवर्तीच्या घरी रविवारी सकाळी पुन्हा एकदा नार्कोटिक्स विभागाची टीम दाखल झाली. यावेळी समन्स घेऊन टीम रियाच्या घरी पोहोचली. या टीममध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलही आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यत NCB कार्यालयात हजर राहण्याकरता समन्स बजावण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा रियाची चौकशी होणार आहे. त्यासाठी NCB कार्यालयात रियाला घेवून जाणार आहेत. हे वाचा-मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीचे वडील भडकले; दिली जळजळीत प्रतिक्रिया सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयसह NCB ही तपास करीत आहे. या प्रकरणात नारकोटिक कंट्रोल ब्युरोच्या हातात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे लागल्याचे सांगितले जात आहे. त्यातच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात काही महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याने यांना अटक केली आहे. या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत NCBच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या