Home /News /entertainment /

सुशांत प्रकरणी धक्कादायक माहितीसमोर, हजारो फेक अकाऊंट तयार करून मुंबई पोलिसांची केली बदनामी

सुशांत प्रकरणी धक्कादायक माहितीसमोर, हजारो फेक अकाऊंट तयार करून मुंबई पोलिसांची केली बदनामी

या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या.

    मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करून अनेक आरोप केले होते. याच दरम्यान, सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकार आणि पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, ट्वीटरवर हजारो अशी फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या  होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या सर्व अकाऊंटचा मुंबई सायबर सेल तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहे. यात दुसरा गुन्हा हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याबद्दल दाखल करण्यात आला. परमबीर सिंग यांचा फोटो मार्फ करून वापरण्यात आला होता. त्यांच्या फोटोवर असभ्य भाषेत टीका करण्यात आली होती. दैनिक हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 80 हजार फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या फेक अकाऊंटच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेक पोस्ट करण्यात आल्या होता. यामध्ये #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR अशा हॅशटॅगचा वापर करून सरकारविरोधात मोहिम राबवण्यात आली होती. पोलिसांनी Information Technology Act अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. सुशांतची हत्या नाही, आत्महत्याच! दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सुशांत प्रकरणात  दिल्लीतील​ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पण, AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या