'अंजली'साठी सुरूची अडारकरची तुफान मेहनत

'अंजली'साठी सुरूची अडारकरची तुफान मेहनत

गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय.

  • Share this:

22 मे : प्रसिद्ध व्हायला कोणाला नाही आवडत . पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते ,  टीव्ही मालिकेच्या कलाकारांसाठी ती किंमत त्यांच्या भरपूर मेहनतीतून दिसते .  कलाकारांना  जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांच्या कामाचं स्वरूप बऱ्याच मेहनतीचं असतं , कलाकारांसाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतोआणि अनेक वेळा अनेक कलाकार भरपूर कामाच्या त्रासामुळे मालिकाही सोडतात .

अशीच हालत सध्या अंजली  मालिकेच्या सुरुची अडारकरची झालीय . मालिका आजपासून (22 मे ) सुरू होतेय. पण अजूनही अनेक  गोष्टींचं शूटिंग वेळेअभावी पूर्ण झालं नाही. सकाळी ९ वाजता लागलेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते.  मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे  एपिसोडची  पूर्ण बँकिंग अजून तयार झालेल नाही.

या  गोष्टीचं महत्त्व  सुरुचीला  नीट समजत असल्यामुळे  ह्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे . प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे केवळ याकरिता सुरुची तुफान जोमाने कामाला लागली आहे .

गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय. तिची ही  मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत  कणसे आणि तिचे इतर सहकलाकार सुद्धा भारावून गेले आहेत . सुरुची अंजलीच्या भूमिकेत इतकी समरस झाली आहे की सेटवर सुद्धा सगळेच तिला तुफानी अंजली या नावानेच हाक मारतात आणि अंजली सुद्धा अगदी हसून न थकता प्रेक्षकांसाठी काम करायला तयार असते . आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता झी युवावरच समजेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2017 04:30 PM IST

ताज्या बातम्या