Surrogacy Bill : शाहरुख, सनी लिओनीसह 'हे' सेलेब्रिटी ठरले शेवटचे ‘लकी पेरेंट’

लोकसभेने सोमवारी (05 ऑगस्ट) कमर्शिअल सरोगसीवर बंदी घालणार बिल संमत केलं. यापुढे देशात कुणाला भाडेतत्त्वावर मातृत्व स्वीकारणं शक्य होणार नाही आणि अशा पद्धतीने कुण्या दुसऱ्याच्या जीवावर पैसे मोजून आई-बाप होता येणार नाही. पण अनेक सेलेब्रिटी याअगोदरच सरोगसीद्वारे आई-वडील झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:57 PM IST

Surrogacy Bill : शाहरुख, सनी लिओनीसह 'हे' सेलेब्रिटी ठरले शेवटचे ‘लकी पेरेंट’

लोकसभेने सोमवारी (05 ऑगस्ट) सरोगसीवर बंदी घालणार बिल संमत केलं. यात कमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सरोगेट मदर म्हणून व्यावसायिक तत्त्वावर कुणाची मदत घेता येणार नाही. असं असलं तरी बॉलिवूडमधील अनेक कलाकार यापूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई- वडील झाले आहेत.

शाहरुख खान- सरोगसीबद्दल भारताला सर्वात आधी शाहरुख खानमुळेच कळलं. शाहरुखचा सर्वात लहान मुलगा अब्रामचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. बादशहाला याआधी आर्यन आणि सुहाना ही दोन मुलं आहेत.

आमिर खान- आमिरची दुसरी पत्नी किरण रावने बाळाला जन्म देण्यासाठी IVF ची मदत घेतली. यानंतर 5 डिसेंबर 2011 ला आझादचा जन्म झाला. आमिरलाही  पहिल्या पत्नीपासून जुनैद आणि इरा ही दोन मोठी मुलं आहेत.

तुषार कपूर- 27 जून 2016 ला तुषारही एका सरोगेट मदरच्या मदतीने बाप झाला. तुषारने मुलाचं नाव लक्ष्य ठेवलं असून तो सिंगल पेरेंट होऊन मुलाचा सांभाळ करत आहे.

लीसा रे- मॉडेल आणि अभिनेत्री लीजा रे गेल्या वर्षी 2 मुलींची आई झाली. 2009 मध्ये लीसाला कर्करोग झाला होता. त्यामुळे मातृत्वासाठी लीसाने सरोगसीची मदत घेतली. सुफी आणि सोलियल ही तिच्या दोन मुलींची नावं आहेत.

Loading...

सनी लिओनी- 37 वर्षांच्या सनीने सुरुवातीला निशाला दत्तक घेतलं. त्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी 2018 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी जुळ्या मुलांची आई झाली.

श्रेयस तळपदे- 43 वर्षीय श्रेयसने 2004 मध्ये दीप्तीशी लग्न केलं. लग्नाला अनेक वर्ष होऊनही मूल न झाल्यानं अखेर श्रेयस आणि दीप्तीने सरोगसीची मदत घेतली. 4 मे 2018 मध्ये आद्याचा जन्म झाला.

करण जोहर- सिंगल पेरंटच्या यादीत करणचं नावही आहे. 46 वर्षांच्या करणने अजून लग्न केलं नाही. मात्र सरोगसीच्या सहाय्याने तो यश आणि रुही या जुळ्या मुलांचा बाबा झाला.

एकता कपूर- सिंगल पेरंट सेलिब्रिटींच्या या मांदियाळीत एकताही सहभागी झाली. टीव्ही क्वीन अशी ओळख असलेल्या एकताही सरोगसीच्या मदतीने आई झाली. 43 वर्षीय एकतानेही भावाप्रमाणे लग्न केलेलं नाही, पण तरीही ती मुलाचा सिंगल पेरंट म्हणून सांभाळ करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...