Home /News /entertainment /

Oscar शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाची एण्ट्री; ‘सोहराई पोटरु’नं मारली बाजी

Oscar शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाची एण्ट्री; ‘सोहराई पोटरु’नं मारली बाजी

भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या ऑस्कर शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाला एण्ट्री मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सुर्या याचा ‘सोहराई पोटरु’ (Soorarai Pottru) हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतरित्या ऑस्कर (Oscar) नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    ऑस्कर (Oscar) हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. दरवर्षी प्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या नजरा या पुरस्कार सोहळ्याच्या दिशेने लागलेल्या असतानाच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या ऑस्कर शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाला एण्ट्री मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सुर्या याचा ‘सोहराई पोटरु’ (Soorarai Pottru) हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतरित्या ऑस्कर (Oscar) नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागात नामांकन मिळवण्यासाठी ‘सोहराई पोटरु’ प्रयत्न करणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा पुरस्कार पटकावण्यासाठी जगभरातील तब्बल ३६६ चित्रपट या स्पर्धेत उतरले आहेत. यापैकी केवळ पाचच चित्रपटांना अंतिम पाचमध्ये जागा मिळेल. अन् त्यापैकी केवळ एकच चित्रपट ऑस्करच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरु शकणार आहे. अंतिम पाच चित्रपटांची नामांकन यादी येत्या १५ एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. रन मल्ला रन.... मलायकाचे बोल्ड फोटो पाहून कतरिनाही झाली अवाक ‘सोहराई पोटरु’ हा एक तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केलं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्या आणि अपर्णा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांसोबतच चित्रपट समिक्षकांनी देखील या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली. परिणामी हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेसाठी पाठवण्यात आला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Oscar, Oscar award

    पुढील बातम्या