• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 786 रुपयांची नोकरी करणारा तरुण कसा झाला सिंघम? पाहा सूर्याचा संघर्षमय प्रवास

786 रुपयांची नोकरी करणारा तरुण कसा झाला सिंघम? पाहा सूर्याचा संघर्षमय प्रवास

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल जेव्हा तो केवळ 786 रुपये मिळवण्यासाठी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता.

 • Share this:
  23 जुलै: सूर्या (Suriya) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. चाहते त्याला लाडाने सिंघम (Singham) असंही म्हणतात. जबरदस्त अभिनय आणि अॅक्शन सीन्स करणारा सूर्या गेली दोन दशकं सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. आज सूर्याचा वाढदिवस आहे. (Suriya Birthday) 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज तो यशाच्या शिखरावर आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल जेव्हा तो केवळ 786 रुपये मिळवण्यासाठी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. ‘..तर थेट घटस्फोट घेऊन मोकळे व्हा’; दलजीतने विवाहित महिलांना दिला खास सल्ला सूर्याचं खरं नाव सूर्या शिवकुमार असं आहे. 1975 साली तमिळनाडूमधील एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळे आंतरशालेय स्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रम, बालनाट्य स्पर्धा इत्यादींमध्ये भाग घेऊन तो आपली आवड भागवत असे. शिक्षण झाल्यावर तो एका कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला लागला. तिथे त्याला 786 रुपये महिना पगार मिळत असे. याच दरम्यान तो प्रायोगित रंगभूमीवर देखील काम करत होता. हे काम करत असतानाच त्याला 1997 साली नेरूक्कू नेर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट फ्लॉप झाला. परंतु सूर्याच्या अभिनयाची मात्र स्तुती करण्यात आली. कशी कराल नैराश्येवर मात? सिद्धार्थ चांदेकरनं सांगितला सोपा उपाय त्यानंतर काढले निम्मादी, संधीपूमा, पेरियाना, श्री यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला. पूवेल्लम कट्टीपूर या चित्रपटामुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. हिरो म्हणून हा त्याचा पहिला सुपरहिट चित्रपट होता. त्यानंतर सुपरहिट चित्रपटांची त्याने रांगच लावली. सिंघम या चित्रपटामुळे तर तो यशाच्या शिखरावरच गेला. याच चित्रपटाचा रिमेक रोहित शेट्टीने बॉलिवूडमध्ये केला होता. कधीकाळी घराचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी नोकरी करणारा सूर्या आज एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.
  Published by:Mandar Gurav
  First published: