सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार

त्यावेळी वाडकर माधुरीहून 12 वर्षांहून मोठे होते. त्यामुळे वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मुलगी खूपच बारीक असल्याचं कारण त्यावेळी वाडकरांनी दिलं होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 11:08 AM IST

सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार

25 मे : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य आहे. तिनं अनेक एव्हरग्रीन सिनेमे दिले. पण याचं श्रेय कुठेतरी गायक सुरेश वाडकरांना आहे. माधुरीचं घर पारंपरिक विचारांचं. त्यांना माधुरीनं सिनेमात काम करणं पसंत नव्हतं.  तिनं फक्त घर-संसार सांभाळावा, या विचारांचे होते. म्हणून खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. आणि असेच ते एक दिवस सुरेश वाडकरांकडे माधुरीचं स्थळ घेऊन गेले होते.

त्यावेळी वाडकरांनी संगीतात स्वतःचं करिअर बनवण्यास सुरुवात केली होती. माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली.त्यावेळी वाडकर माधुरीहून 12 वर्षांहून मोठे होते. त्यामुळे वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मुलगी खूपच बारीक असल्याचं कारण त्यावेळी वाडकरांनी दिलं होतं.

मग1984 मध्ये माधुरीनं अबोध चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं. आणि तिनं मागं वळून पाहिलंच नाही. पुढे 1999 मध्ये माधुरीनं डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून संसार थाटला.पण त्यावेळी मिळालेल्या एक नकारानं माधुरीचं ग्लॅमरस करियर घडलं आणि ती स्टार बनली. पुढे अनेकदा माधुरीच्या सिनेमांसाठी वाडकरांनी पार्श्वगायनही केलंय.

 

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...