Home /News /entertainment /

सरकारला सुनावले होते खडेबोल; सुरेखा सिक्री लॉकडाऊनमुळे होत्या संतप्त

सरकारला सुनावले होते खडेबोल; सुरेखा सिक्री लॉकडाऊनमुळे होत्या संतप्त

सरकारनं कोरोनामुळे 65 वर्षांवरील कलाकारांना काम करण्यास मनाई केली होती. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या रोजगाराचं काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला होता.

    मुंबई 16 जुलै: बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचं दुखद निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. (Surekha Sikri passes away) सुरेखा यांच्या निधनामुळे भारतीय मनोरंजनसृष्टी आज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाली आहे. सुरेखा या अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही पुढे होत्या. अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत त्या संलग्न होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मनोरंजनसृष्टीतील जेष्ठ नागरिकांसाठी सरकारविरोधात आवाज उठवला होता. सरकारनं कोरोनामुळे 65 वर्षांवरील कलाकारांना काम करण्यास मनाई केली होती. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या रोजगाराचं काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला होता. अभिनेत्री नव्हे तर व्हायचं होतं पत्रकार! वाचा सुरेखा सिक्रींचा अनोखा किस्सा सहा महिन्यांपूर्वी बॉलिवूड लाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सुरेखा सीकरी यांनी सरकारच्या लॉकडाउन नियमांविरोधात आवाज उठवला होता. “लॉकडाउनमुळे मी नक्कीच आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. ज्या मालिकांमध्ये काम केलं त्यांचे पैसे मला अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी ही आर्थिक टंचाई उद्भवली आहे. मात्र मला माझ्या समस्यांची जाहीरात करायची नाही. कारण मला कोणाकडूनही दान नकोय मला फक्त काम हवंय. सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांसाठी तयार केलेला हा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी हा नियम त्वरीत रद्द करावा, जेणेकरुन आम्ही जेष्ठ कलाकार देखील काम करुन आपलं पोट भरु शकू.” अशी विनंती त्यांनी सरकारला केली होती. त्यांची ही मुलाखत आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. आपल्या सौंदर्यानंच प्रेक्षकांची मनं जिंकायच्या माला सिन्हा; 12 लाखांसाठी लावलेली अब्रुची बाजी सुरेखा सिक्री या बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. 1978 साली ‘किस्सा कुर्सीका’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नसीब’, ‘सरफरोश’, ‘हेरा फेरी’, ‘देवडी’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. चित्रपटांशिवाय मालिकांमध्येही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. 1990 साली सांझा ‘चूल्हा’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘कभी कभी’, ‘बुनियाद’, ‘सीआयडी’, ‘केहना है कुछ हमको’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये त्यांनी काम होतं. सुरेखा यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहच्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या