Home /News /entertainment /

Qubool Hai 2.0: 'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती शूटिंगवेळी घसरली आणि... VIDEO VIRAL

Qubool Hai 2.0: 'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती शूटिंगवेळी घसरली आणि... VIDEO VIRAL

छोट्या पडद्यावरील नागिन (Nagin) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surabhi Jyoti) हिचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  मुंबई, 17 डिसेंबर: ‘कोव्हिड 19’च्या (Covid 19) साथीमुळं दीर्घकाळ रखडलेल्या चित्रपट, वेबसीरीजच्या शूटिंगना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळं छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर आणि शूटिंग दरम्यानचे फोटो, शूटिंगमधील गमतीजमतीचे किस्से, त्याचे व्हिडीओ शेअर करत आहेत. सोशल मीडियावर सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. छोट्या पडद्यावरील नागिन (Nagin) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surabhi Jyoti) हिचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुरभी ज्योती हिचा ‘कुबूल है 2.0’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे.  सफेद रगांचा लेहंगा घातलेली सुरभी यामध्ये पाय घसरून पडली असून तिनेच हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. झोया फारुकी (Zoya Farooqui) हे तिचं कुबूल है मधील पात्र विशेष गाजलं होतं. यामध्ये तिने एका चंचल, नौंटकी, नटखट नायिकेचं पात्र साकारलं होतं. तिनं या व्हिडिओला देखील Zoya Moments असं कॅप्शन दिलं आहे. बेलग्राडमध्ये (Belgrade)या मालिकेचं शूटिंग सुरू असून, तिच्याबरोबर करणसिंग ग्रोव्हर (Karansingh Grover) ‘असद’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

  ‘कुबूल है’ ही मालिका झी टीव्हीवर (Zee TV)खूप लोकप्रिय झाली होती. त्याचं दुसरं पर्व ‘कुबूल है 2’ आता वेबसिरीजच्या माध्यमातून ‘झी 5’वर (Zee 5) प्रसारित होणार आहे. या वेबसिरीजची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सुरभी ज्योती ‘झोया फारुकी’ हे पात्र साकारत असून, करणवीर सिंग ग्रोव्हर असदची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळं सुरभी ज्योतीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. सुरभी ज्योती ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. 2012 मध्ये तिनं कुबूल है सिरीयलमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. 2015 मध्ये तिनं ‘प्यार तुने क्या किया’ या कार्यक्रमाच्या तीन पर्वांचं सूत्रसंचालन केलं. 2018 मध्ये तिनं  ‘नागिन 3’ मालिकेत काम केलं. तिची ही भूमिकाही खूप गाजली. आता ती ‘कुबूल है 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Television, Television show

  पुढील बातम्या