Home /News /entertainment /

VIDEO: ना मोठं स्टेज, ना मोठा शो; अंबाबाईच्या मंदिरात खाली बसून अवधूत गुप्तेनं गायलं गाणं

VIDEO: ना मोठं स्टेज, ना मोठा शो; अंबाबाईच्या मंदिरात खाली बसून अवधूत गुप्तेनं गायलं गाणं

प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ( Avdhoot Gupte) कायम त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. अवधूतनं नुकतीच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) भेट दिली. तिथं त्यानं गाणं देखील गायलं. त्याच्या त्या गाण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई,10 जून:  आताच्या काळात कलाकाराला त्याची कला सादर करायची असेल तर त्यासाठी मोठा स्टेज, मोठा शो लागतो. पण असे फार मोजके कलाकार आहेत, जे आहे त्यातही समाधान मानून आपल्या कलेला जास्त महत्त्व देतात. असाच एक कलाकार म्हणजे सर्वांचा लाडका गायक अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) आपल्या कडक, धमाकेदार, चाबूक गायकीनं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. आज करिअरच्या उच्च शिखरावर असताना अवधूतनं मात्र त्याचा नम्रपणा, साधेपणा सोडलेला नाही. याचा प्रत्येत देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात अवधूत गुप्ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या (Kolhapur Ambabai Temple) मंदिरात खाली बसून गाणं गात आहे. त्याचप्रमाणे अवधूतनं गाण्याच्या व्हिडीओबरोबर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अवधूत गुप्ते पुन्हा एकदा कलर्स मराठीच्या ( Colors Marathi) सूर नवा ध्यास नवा ( Sur Nava Dhyas Nava) कार्यक्रमाच्या नव्या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्या निमित्तानं संपूर्ण टीम कोल्हापूरला गेलीय. कोल्हापूरात गेल्यानंतर अवधूतसह संपूर्ण टीमनं अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यानं देवीच्या गाभाऱ्यात जमिनीवर बसून 'देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं' हे त्याच्या 'एक तारा' सिनेमातील गाणं गायलं.
  अंबाबाईच्या चरणाची आपली कला सादर करणाऱ्या अवधूतनं एक पोस्ट शेअर केलीय. ज्यात त्यानं म्हटलंय, 'कोरोनाच्या दोन वर्षांत कोल्हापूरला येणंच झालं नाही. दोन्ही गणपतींच्या वेळेस अगदी ठरलं आणि शेवटच्या क्षणी कॅन्सल झालं. पण आता "सूर नवा.." च्या ऑडिशनच्या निमित्ताने कोल्हापूरला आलो आणि सर्वात पहिल्यांदा गाठलं ते म्हणजे आई अंबाबाईचं मंदिर! हेही वाचा - Amey Wagh Photos: वाघाचा swag इतका भारी की स्वप्नात पण जातो अवॉर्ड घ्यायला; काय आहे भानगड? अवधूतनं पोस्टमध्ये पुढे म्हटलंय,  एरवी मी पहिल्या मजल्यावरील गाभाऱ्याला हजेरी देतो. पण, कसं काय कुणास ठाऊक  ह्या वेळेस आई समोरील पहिला मंडप अगदी रिकामा होता! अनिकेत गुरुजी म्हणाले "संधी चांगली आहे... आज ईथेच होऊन जाऊ द्या!" मग पडत्या फळाची आज्ञा मानून मी सुद्धा सुरू झालो!! अवधूतनं लिहिलेली पोस्ट आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याच्या नम्रतेचं सर्वजण कौतुक करत आहेत.  'खूप सुंदर', 'आई अंबाबाई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल', तर एका युझरनं म्हटलंय, 'ना मोठा स्टेज ना मोठा शो, मंदिरात खाली बसून गाणारा हा पहिला गायक आहे', असं म्हणत अवधूतचं कौतुक केलंय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Colors marathi, Kolhapur, Marathi actress, Marathi cinema, Singer

  पुढील बातम्या