महागुरूंची लेक श्रिया परदेशात करतेय शूटिंग

महागुरूंची लेक श्रिया परदेशात करतेय शूटिंग

वडील महागुरू. अभिनय, संगीत, नृत्य सगळ्यातच माहीर. तर आईही दिग्गज कलाकार. अशांची लेकही तेवढीच तगडी कलाकार असणारच.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : वडील महागुरू. अभिनय, संगीत, नृत्य सगळ्यातच माहीर. तर आईही दिग्गज कलाकार. अशांची लेकही तेवढीच तगडी कलाकार असणारच. आम्ही बोलतोय श्रिया पिळगावकरबद्दल. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक. श्रियाचं अभिनयातलं पदार्पण झालं ते एकुलती एक सिनेमातून. त्यानंतर ती शाहरूख खानच्या फॅन सिनेमातही होती.तसंच फ्रेंच सिनेमातही तिनं भूमिका साकारलीय.

प्रश्न असा आहे की ती सध्या काय करतेय? आता श्रिया एका ब्रिटिश टीव्ही सिरीजमध्ये झळकणार आहे. गुरिंदर चढ्ढा यांच्या 'बीचम हाऊस' या सिरीजमध्ये श्रिया काम करत आहे. सध्या या सिरीजचं लंडनमध्ये शूटिंग सुरू आहे. याच शूटिंग दरम्यानचे फोटो श्रियाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तसंच लंडनमध्ये विविध ठिकाणांचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या सिरीजच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये बिझी असल्याने श्रिया यंदा गणेशोत्सवाचा आनंदही घेऊ शकली नाही. गणेशोत्सवाचा आनंद मिस करत असल्याची पोस्टसुद्धा श्रियानं सोशल मीडियावर शेअर केली होती.

मध्यंतरी, महागुरू सचिन पिळगांवकर त्यांच्या एका गाण्यामुळे चर्चेत आलेत. हे गाणं  'आमची मुंबई-मुंबई अँथम' या नावाने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलंय. जे गाणं रिलीज पाहिल्यानंतर अनेकांच्या जीवाचा नुसता तिळपापड झाला. मुंबई शहराला ट्रिब्युट देण्यासाठी रिलीज केलेलं हे गाणं पाहून अनेकांनी त्यांना असं गाणं पुन्हा कधीही करू नका अशी विनंती केली.

तर दुसरीकडे हे गाणं प्रचंड ट्रोल व्हायला लागलं. काहींनी तर 'सचिनजींना आवरा' असा हॅशटॅगच सुरू केला. तर काहींनी सचिनजी पैशांची कमतरता वाटत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही निधी गोळा करू पण पुन्हा असा आत्याचार करू नका असंही त्यांना खडसावलं. एकंदर या गाण्याबाबत सुरू असलेली चर्चा पाहून स्वतः सचिनजींनी पुढाकार घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. आणि ते गाणं त्यांना नाईलाजानं करावं लागलं होतं.

First published: September 22, 2018, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading