Tandav Case : Amazon च्या अपर्णा पुरोहितांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Tandav Case : Amazon च्या अपर्णा पुरोहितांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाच्या (Amazon Prime Video India) तांडव (Tandav) या वादग्रत वेबसीरिजच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित (Aparna Purohit) यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च: अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाच्या (Amazon Prime Video India) तांडव (Tandav) या वादग्रत वेबसीरिजच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित (Aparna Purohit) यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. अपर्णा पुरोहित यांना अटक करू नये, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता समाप्त झाली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल (OTT Platform) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांवरही टिप्पणी केली.

'सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारने जे नियम तयार केले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्याद्वारे खटला चालवण्याइतके ते सबळ नाहीत,' असं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, याच खटल्यात शुक्रवारच्या सुनावणीवेळी कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह कंटेंट दाखवला जात असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफीही दाखवली जात असल्याने त्या कंटेंटवर नियंत्रण असणं आवश्यक आहे, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

(हे वाचा-दीपिका पदुकोण ते श्रद्धा कपूर; NCBच्या आरोपपत्रात या अभिनेत्रींची नावं आली समोर)

अपर्णा पुरोहित यांची बाजू लढवत असलेले वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करताना सांगितलं, की ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीचे नियम आताच आले आहेत. आता कंपनी लवकरच ते पाहील. तसंच अपर्णा या अ‍ॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. या प्रकरणी कारवाई करायचीच झाली, तर ज्यांनी वेबसीरिज तयार केली, त्यांच्याविरोधात व्हायला हवी, असंही मुकुल रोहतगी म्हणाले.

अटकपूर्व जामीन देण्यास अलाहाबाद कोर्टाने दिला होता नकार

या प्रकरणात 25 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. तांडव या वेबसीरिजमधून हिंदू देवी-देवतांचं अवमानकारक चित्रण आणि धार्मिक द्वेषाला खतपाणी घातलं जात असल्याच्या आरोपांवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. हिंदू देवी-देवतांची बदनामी करणं आणि पंतप्रधानांचं पात्र नकारात्मक पद्धतीने दर्शवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

First published: March 5, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या