S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ऐतिहासिक तथ्यानुसार जोवर सिनेमातील चुका दुरूस्त केल्या जाणार नाहीत तोवर सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी या याचिकेत केली होती.

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2017 07:58 PM IST

'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

10 नोव्हेंबर :  संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. हा निर्णय आता सेंसार बोर्डाच्या कोर्टात टोलवण्यात आलाय.

'पद्मावती' या सिनेमाला राजपूत संघटना सातत्याने विरोध करत आहेत. 1 डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं प्रदर्शन थांबवावं यासाठी राजपूत संघटनांनी याचिकादेखील दाखल केली होती. ऐतिहासिक तथ्यानुसार जोवर सिनेमातील चुका दुरूस्त केल्या जाणार नाहीत तोवर सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी या याचिकेत केली होती. ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

हा प्रश्न सेन्सॉर बोर्डाच्या आखत्यारीत असल्यामुळे आम्ही यात हस्तक्षेप करू शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाच या सिनेमाचे नवे पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. सिंहासनावर बसलेल्या राजा रतन सिंह महारावल म्हणजेच शाहिद कपूरचे हे नवे पोस्टर आहे.सेंसोर बोर्डाचे सदस्य अर्जून गुप्ता यांनी तर संजय लीला भंसाळी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असंही वक्तव्य केलंय. पण सेंसॉर बोर्डाने अद्याप पद्मावतीला प्रमाणपत्र दिलेलं नाही, ते प्रमाणपत्र दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय पाऊल उचलणार, पद्मावतीच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार की आणखी अडचणी वाढणार, राजपूत संघटना आता काय पवित्रा घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष वेधलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close