Home /News /entertainment /

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर तब्बल 3 तास झाली सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर तब्बल 3 तास झाली सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

    मुंबई, 11 ऑगस्ट: अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.  देशाचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) त्यांच्या निर्णयात हे निश्चित करणार आहे की, रियाविरोधात बिहारमध्ये दाखल करण्यात आलेली एफआयआर मुंबईमध्ये ट्रान्सफर केली जाईल की नाही. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निर्णयात हे देखील निश्चित करेल की याप्रकरणी सीबीआय तपास करेल की नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे लिखित जबाब गुरुवार पर्यंत दाखल करण्यास सांगितले आहे. रियाच्या वतीने वरिष्ठ वकील श्याम दिवान यांनी तर बिहार सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. सुशांतच्या वडिलांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह आणि महाराष्ट्र सरकारकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी आपापली बाजू मांडली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारत्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.याप्रकरणी तब्बल 3 तास झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा-स्वरा भास्करने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर) अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात अशी याचिका दाखल केली होती की, बिहार पोलिसात तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर मुंबईमध्ये ट्रान्सफर केली जावी. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर पाटणामध्ये दाखल केली होती. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी या एफआयआरमध्ये केला होता. (हे वाचा-मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील (Sushant Singh Rajput Death) मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचे फोन जप्त केले आहेत. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी या तिघांची दीर्घ काळासासाठी कसून चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये विरोधाभासी उत्तर मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ईडीकडून मंगळवारी देखील रियाच्या कुटुंबीयांची चौकशी होत आहे. याआधी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी (Shruti Modi) आणि त्याचा रुममेट तसंच क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) यांचे देखील ईडीकडून जबाब नोंदवण्यात आले. काही कागदपत्रे यावेळी श्रुतीकडे मागण्यात आली आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या