सुप्रीम कोर्टाचा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील; चारही राज्यांत होणार रिलीज

सुप्रीम कोर्टाचा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील; चारही राज्यांत होणार रिलीज

आज सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमावर मोठा निर्णय दिला आहे. चारही राज्यात पद्मावर सिनेमा रिलीज होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं जाहिर केला आहे.

  • Share this:

18 जानेवारी : बॉलिवूडचा वादात असलेला बहुचर्चीत पद्मावत सिनेमा अखेर वादाच्या भोवऱ्यातून सुटला असं म्हणायला हवं. कारण आज सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमावर मोठा निर्णय दिला आहे. चारही राज्यात पद्मावर सिनेमा रिलीज होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं जाहिर केला आहे. संजय लिला बंसाली यांच्या पद्मावत सिनेमावर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा सरकारनं बंदी घातली होती. सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली आहे.

या आधी मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी पद्मावत सिनेमावर पत्रही लिहलं होतं. 'जोपर्यंत या सिनेमात आवश्यक बदल केले जात नाही तोपर्यंत हा सिनेमा रिलीज केला जावू नये.' असा या पत्राद्वारे आग्रह करण्यात आला होता.

या सगळ्या विरोधामुळे या सिनेमाचं नाव बदललं, 26 दृश्यांना कात्री लावण्याची तयारी दाखवली, सेन्सॉर बोर्डाची अग्निपरीक्षा पार केली आणि आता अखेर जावून या सिनेमावर बंदी उठवण्यात आली आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर चार राज्यांतून काय प्रतिक्रिया उमटतील यावरही सगळ्यांचं लक्ष आहे.

 

First Published: Jan 18, 2018 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading