SSR Death : मुंबई पोलिसांना 'ते' टाळता आलं असतं, वाचा काय आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश

SSR Death : मुंबई पोलिसांना 'ते' टाळता आलं असतं, वाचा काय आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)चाहत्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजुने निकाल दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)चाहत्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजुने निकाल दिला आहे. रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

- फौजदारी उल्लंघन आणि पैशांचा गैरवापर यासंबंधी आरोप अखेरीस पाटण्यात (जिथे तक्रारदार राहतात) नोंदवण्यात आला आहे. ते पाटणा पोलिसांच्या कायदेशीर कार्यक्षेत्रात सूचित करते.

-सीबीआय का?- सत्याचा शोध स्वतंत्र एजन्सीकडून घेण्यात आला आहे याची खात्री करुन घेण्यासाठी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तपासाची विश्वासार्हता आणि तपास अधिकारी सुरक्षित करणे आवश्यक आहे.

(हे वाचा-सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे)

-मुंबई मध्ये बिहार पोलिसांच्या पथकात अडथळा निर्माण करण्यात आला. यामुळे संशय वाढला. हे  टाळता आले  असते. त्यांना चौकशीच्या  अधिकार आहे. मुंबई पोलिसांनी मर्यादित चौकशी केली. त्यांनी नोंदवलेली कलमे, अनैसर्गिक मृत्यूची नोंद याची निश्चितता सांगता येत नाही. अनैसर्गिक मृत्यूचे इतर पैलू शोधण्यासाठी सीबीआयकडे एफआयर नोंदवली आहे. तपासाला विश्वासार्हता देण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी.

-रियाने स्वत: सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अशावेळी हाच इच्छित न्याय होईल.

-निःपक्षपाती तपासणीतून खऱ्या वस्तुस्थितीचा प्रसार झाल्यास निर्दोष लोकांना न्याय मिळेल, जे कदाचित निर्दोष मोहिमेचे लक्ष्य असू शकतात.

- सुशांत सिंह राजपूत एक प्रतिभावान अभिनेता होता.

(हे वाचा-सुशांतप्रकरणी पार्थ पवारांनी पुन्हा सरकारला डिवचलं, रोहित पवार म्हणाले...)

- मुंबई चित्रपट जगात आणि त्याच्या पूर्ण संभाव्यतेची जाणीव होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्याचे कुटुंब, मित्र आणि प्रशंसक तपासणीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत

-सक्षमआणि निःपक्षपाती तपासणी ही काळाची गरज आहे

सत्यमेव जयते.

महाराष्ट्र सरकारसाठी मोठा झटका

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी हा मोठा झटका मानण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला संविधान बेंचमध्ये आव्हान देखील देऊ शकते.

(हे वाचा-सुशांत प्रकरणी ठाकरे सरकारला धक्का, मात्र पार्थ पवार म्हणतात 'सत्यमेव जयते')

न्यायाधीश ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले की ते कोर्टाने आदेश दिले आहेत की सीबीआय चौकशी होईल आणि महाराष्ट्र सरकारला यामध्ये आव्हान देण्यास जागा नाही. पाटणा येथे एफआयआर नोंदवणे कायदेशीररित्या वैध असून 'क्रिमिनल प्रोसिजर कोड'च्या तत्त्वांचे पालन केले असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले. कोर्ट पुढे म्हणाले की, सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारने केलेली शिफारसही योग्य आणि वैध होती.

35 पानांच्या निकाल आज कोर्टाने जाहीर केला. कोर्टाच्या आदेशांचे महाराष्ट्र सरकारने आदेशांचे पालन केले पाहिजे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशी प्रक्रियेबद्दल कोर्टाने निर्देश दिले की आतापर्यंत सर्व संबंधित कागदपत्रे सीबीआयकडे देण्यात यावीत. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ती, अंकिता लोखंडे, कंगना रणौत आणि अक्षय कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपमधील नेत्यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 2:03 PM IST

ताज्या बातम्या