मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दिशा सालियाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागा; सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

दिशा सालियाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागा; सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

दिशा सालिया(Disha salian)च्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात जा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दिशा सालिया ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 26 ऑक्टोबर:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे त्याच्या आधीच्या मॅनेजरच्या मृत्यूबद्दलही अपडेट्स येत आहेत. दिशा सालिया (Disha Salian)च्या मृत्यूबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात (Bombay High court) जाण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआय (CBI)कडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली आहे. पुनीत कौर यांनी दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी दिशा सालिया हिने आत्महत्या केली.  8 जून 2020 रोजी दिशाच्या घरात पार्टी होती. या पार्टीला तिचा बॉयफ्रेंड रोहन रॉय आणि इतर 6 जण उपस्थित होते. पार्टीनंतर  दिशाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन तिचं जीवन संपवलं. दिशावर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. असा आरोप करण्यात येत आहे. दिशाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता याचिकाकर्ते काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल
First published:

Tags: Suicide, The Bombay High Court

पुढील बातम्या