VIDEO: गोविंदाचा नादच खुळा; वाढदिवसाच्या पार्टीतील डान्समुळे पब्लिकला लावलं वेड

VIDEO: गोविंदाचा नादच खुळा; वाढदिवसाच्या पार्टीतील डान्समुळे पब्लिकला लावलं वेड

वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाने त्याच्याच खास स्टाइलमध्ये डान्स केला. 57 व्या वर्षीही गोविंदाने एखाद्या तरुणाला लाजवेल अशा जोशात डान्स केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) नुकताच त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जोरदार पार्टी झाली. या पार्टीचं विशेष आकर्षण ठरला तो गोविंदाचा डान्स. गोविंदाच्या डान्सने पूर्ण एक दशक गाजवलं. पण आजही त्याच्या डान्सची जादू कमी झालेली नाही. त्याच्या खास लकबीने त्याने केलेला डान्स पार्टीला जमलेल्या सगळ्याच सेलिब्रिटींना भावला.

गोविंदाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पत्नी सुनीता (Sunita) आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी गोविंदाला साथ देत चार चांद लावले. हिरो नंबर वन, कुली नंबर 1  या चित्रपटातील गाण्यावर त्याने अफलातून डान्स केला. कपील शर्मा (Kapil Sharma), शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी पार्टीला येत पार्टीची रंगत वाढवली. गोविंदाच्या पार्टीला इतरही अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

1986 साली प्रदर्शित झालेल्या इल्जाम या चित्रपटातून त्याच्या फिल्म करिअरला सुरुवात झाली आणि गोविंदाने मागे वळून पाहिलं नाही. कुली नंबर 1, राजा बाबू, अखियोसें गोली मारे, हिरो नंबर 1, दुल्हे राजा, शोला और शबनम, साजन चलें ससुराल, जोडी नंबर 1, हसीना मान जाएगी अशा अनेक सुपरहिट चित्रपट गोविंदाने गाजवले. गोविंदा असला की कॉमेडी आणि भन्नाट डान्स पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांची धारणाच झाली होती. आजही गोविंदाचे चित्रपट तेवढ्याच उत्साहाने पाहिले जातात.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 22, 2020, 10:51 AM IST

ताज्या बातम्या