राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत रजनीकांत यांची एंट्री ?

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत रजनीकांत यांची एंट्री ?

सुपरस्टार रजनीकांत हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. केंद्र सरकार सर्वसहमतीचं नाव देईल अशी शक्यता आहे

  • Share this:

19 मे : सुपरस्टार रजनीकांत हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. केंद्र सरकार सर्वसहमतीचं नाव देईल अशी शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत अनेक नावांची राष्ट्रपतिपदासाठी चर्चा होऊ लागलीये.

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येण्याबाबत सर्वात मोठा संकेत दिला. सिस्टिम सडली आहे,फार मोठ्या बदलाची गरज आहे.मोठ्या लढाईसाठी तयार राहा, असं सूचक वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. पण राजकारणात येणार का, यावर ते काही बोलले नाहीत. आपल्या भाषणात त्यांनी द्रमुकचे नेते स्टालिन यांचंही कौतुक केलं.

त्यातच आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत अचानकपणे तलायवा रजनीकांतच्या नावाचा समावेश झालाय. रजनीकांतच्या या नावाबाबत कोणत्याही राजकीय पक्षानं अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण रजनीकात यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading