…आणि डोक्यापासून पायांपर्यंत हलली शिल्पा शेट्टी, म्हणाली, ‘मला काही तरी होतंय’

…आणि डोक्यापासून पायांपर्यंत हलली शिल्पा शेट्टी, म्हणाली, ‘मला काही तरी होतंय’

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या डान्स रिअलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर ३' मध्ये परिक्षकेच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये शिल्पा फार मजेशीर अंदाजात पाहायला मिळते.

  • Share this:

मुंबई, ०५ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या डान्स रिअलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर ३' मध्ये परिक्षकेच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये शिल्पा फार मजेशीर अंदाजात पाहायला मिळते. शिल्पाला जेव्हा कोणत्या मुलाचा परफॉर्मन्स आवडतो तेव्हा त्या मुलासाठी शिल्पा शिड्या चढते. तसेच आपल्या मजेशीर अंदाजात ती त्यांचं कौतुकही करते. शिल्पाचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांनाही फार आवडत आहे.

नुकताच सोनी टीव्हीने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला. प्रोमोमध्ये शिल्पा शोमध्ये भाग घेणाऱ्या मुलांचे परफॉर्मन्स पाहून फार खूश होते. तेवढ्यात शिल्पाच्या अंगात एक वेगळीच ताकद येते आणि ती डोक्यापासून पायापर्यंत कापायला लागते. यावेळचे शिल्पाचे हावभाव पाहण्यासारखे होते. तिचे हेच हावभाव पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. थोड्यावेळाने शिल्पा बोलते की, ‘मला काहीतरी होतंय’ यानंतर ती पुन्हा कापायला लागते.

शिल्पाचा हा मजेशीर व्हिडिओ इथे पाहा-

शोमध्ये शिल्पाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भलताच आवडत आहे. या शोचे प्रेक्षक म्हणतात की, शिल्पा या लहान मुलांसोबत फार चांगल्या पद्धतीने वागते. तर काहींच्या मते, या व्हिडिओमध्ये शिल्पा ओवर अक्टिंग करत आहे. याआधी एका भागात भावूक करणारा व्हिडिओ समोर आला होता. यात शिल्पा तिच्या भावना रोखू शकली नव्हती. शिल्पा तो परफॉर्मन्स पाहून रडली होती. तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला होता तेव्हाही युजर्स तिला ओव्हर अक्टिंग करतेय असं बोलून ट्रोल केलं होतं.

VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

First published: April 5, 2019, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading