मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Florina Gogoi ठरली 'Super Dancer4'ची विजेती; तर फायनलिस्टना मिळालं तब्बल इतकं मानधन

Florina Gogoi ठरली 'Super Dancer4'ची विजेती; तर फायनलिस्टना मिळालं तब्बल इतकं मानधन

 आसामच्या फ्लोरिना गोगोई(Florina Gogoi) चिमुकलीने 'सुपर डान्सर ४'(Super Dancer 4) ची ट्रॉफी पटकावत विजेती (Winner) बनण्याचा मान मिळवला.

आसामच्या फ्लोरिना गोगोई(Florina Gogoi) चिमुकलीने 'सुपर डान्सर ४'(Super Dancer 4) ची ट्रॉफी पटकावत विजेती (Winner) बनण्याचा मान मिळवला.

आसामच्या फ्लोरिना गोगोई(Florina Gogoi) चिमुकलीने 'सुपर डान्सर ४'(Super Dancer 4) ची ट्रॉफी पटकावत विजेती (Winner) बनण्याचा मान मिळवला.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,10ऑक्टोबर- आसामच्या फ्लोरिना गोगोई(Florina Gogoi) चिमुकलीने 'सुपर डान्सर ४'(Super Dancer 4) ची ट्रॉफी पटकावत विजेती (Winner) बनण्याचा मान मिळवला. शनिवार ९ ऑक्टोबरला सुपर डान्सर ४ चा अंतिमसोहळा पार पडला. यावेळी शोचे परीक्षक अनुराग बसू, शिल्पा शेट्टी आणि गीता माँ यांच्या हस्ते या विजेतीला ट्रॉफी आणि मानधन देण्यात आलं.

सोनी वाहिनीवर गेली अनेक दिवस 'सुपर डान्सर' या प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शोचा चौथा सीजन आपल्या भेटीला येत होता. शोमधील छोट्या -छोट्या स्पर्धकांनी आपल्या डान्सने सर्वांनाच सोडलं होतं. अनेक दिवस या बाळ डान्सर आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी या दिवसासाठी मेहनत घेतली होती. अखेर काल 'सुपर डान्सर ४'चा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये आसामची फ्लोरिना गोगोई ही चिमुकली सुपर डान्सरची विजेती ठरली. तर कर्नाटकचा पृथ्वीराज प्रथम उपविजेता (फर्स्ट रनरपअप) आणि पंजाबचा संचित चाणान हा द्वितीय रनरअप (सेकंड रनरअप)ठरला. यावेळी मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी शोच्या तिन्ही परीक्षकांनी अर्थातच शिल्पा शेट्टी, अनुराग बसू आणि गीता माँने विजेत्यांना ट्रॉफी आणि मानधन देऊन त्यांनाच सत्कार केला.

(हे वाचा:'तारक मेहता..'मध्ये एन्ट्री करणार 'जुना सोढी'; अभिनेत्याने स्वतः दिली HINT)

विजेत्यांना किती मिळालं मानधन-

'सुपर डान्सर ४' मध्ये विजेती ठरलेल्या फ्लोरिना गोगोईला विजेती झाल्यानंतर ट्रॉफी आणि १५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर त्याचा मार्गदर्शक असणारा डान्सर तुषार शेट्टीला ५ लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उपविजेत्याला प्रत्येकी १ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच या ५ फायनलिस्टना शो आयोजकांकडून एक रेफ्रिजिरेटर आणि एक एअर प्युरिफायर देण्यात आलं आहे. तसेच भागीदारी बँकेकडून अर्थातच स्पॉन्सर्सकडून पाचही फायनलिस्टना ५१ हजरांचा धनादेश देण्यात आला आहे.

(हे वाचा:इंडियन आयडॉल फेम पवनदीप-अरुणिताने गुपचूप उरकलं लग्न? Wedding फोटो होतोय VIRAL)

काय म्हणाली फ्लोरिया-

'सुपर डान्सर ४'ची विजेती ठरलेल्या आसामच्या फ्लोरिनाने यावेळी सर्वांचे आभार मानत म्हटलं, '“मला काय म्हणायचे ते समजत नाहीय! मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. मला वाटत नाही की मी हा दिवस कधीच विसरू शकेन. सुपर डान्सरवर मला वोटिंग करणाऱ्या आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी खूप आभार मानू इच्छितो. आणि तुषारदादाने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला प्रशिक्षण दिल्याबद्दल खूप मोठे आभार. सुपर डान्सरमुळे मी अनेक नवीन मित्र बनवले आहेत. मी त्यांना मिस करेन. मला नृत्य सुरू ठेवायचे आहे आणि नवीन फॉर्म शिकायचे आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tv shows