Super 30 चे रिअल हिरो आनंद कुमार 'या' गंभीर आजाराशी देतायत झुंज

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखातीत आनंद कुमार यांनी त्यांच्या आजाराविषयी खुलासा केला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 12:02 PM IST

Super 30 चे रिअल हिरो आनंद कुमार 'या' गंभीर आजाराशी देतायत झुंज

पटनामध्ये सुपर 30 कोचिंग क्लासेस चालवणारे प्रोफेसर आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित super 30 हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमातून प्रेक्षकांना आनंद कुमार यांच्याविषयी बरंच काही समजणार आहे. मात्र कमी लोकांना माहीत आहे की, सिनेमाचा रिअल हिरो एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखातीत आनंद कुमार यांनी या गोष्टीचा खुलासा केला. त्यांना एक गंभीर आजार असल्यानं एवढ्या कमी वेळात त्यांच्यावर सिनेमा बनला आहे. या मुलाखतीत आपल्या आजाराविषयी बोलताना आनंद कुमार भावुक झाले होते.

आनंद कुमार स्वतःला नशीबवान समजतात की ते स्वतःचा जीवनप्रवास त्यांच्या मृत्यूपूर्वी पाहणार आहेत. या मुलाखातीत त्यांनी सांगितलं माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे की जिवंतपणीच मी माझा जीवनप्रवास या बायोपिकमधून पाहणार आहे.

आनंद कुमार यांनी सांगितलं, काही वर्षांपूर्वी त्यांना कमी ऐकू येत असे. त्यावेळी त्यांनी चेकअप केल्यावर त्यांना समजलं की त्यांची 80 ते 90% ऐकण्याची क्षमता संपली आहे. पण त्यावर उपचार केल्यावरही काही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांनी 2014 मध्ये राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्यांनी पुन्हा उपचार घ्यायला सुरुवात त्यावेळी त्यांनी ब्रेन ट्यूमरचं निदान झालं.

डॉक्टर्सनी आनंद कुमार यांना सांगितलं की, त्यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि प्रत्येक ऑपरेशन नंतर त्याचा धोका वाढत आहे. ब्रेन ट्यूमरचा परिणाम त्यांच्या इतर अवयवांवरही होतं आहे. आनंद कुमार सांगतात 2014 मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनाही याबाबत समजलं होतं मात्र मी त्यानंतरही काम करत राहिलो.

Loading...

 आनंद कुमार हे एक प्रसिद्ध प्रोफेसर आहेत. ते आयआयटी-जेईईच्या एंटरन्स एक्झामसाठी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतात. एक शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य बदललं आहे. त्यांच्या या कामासाठी 2010 मध्ये टाइम्स पत्रिकाने ‘द बेस्ट ऑफ एशिया’ यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...