सनी लिओनी करतेय प्रोस्थेटिक मेकअप

या मेकअपमध्ये सनीला ओळखणंही कठीण जातंय. फोटोमध्ये तिचा पूर्ण चेहरा कपड्याने गुंडाळलेला दिसतोय. या मेकअपसाठी तब्बल पाच ते सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2017 07:18 PM IST

सनी लिओनी करतेय प्रोस्थेटिक मेकअप

19 सप्टेंबर : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीला लागलीये. सनी या सिनेमासाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतेय.तिने याच मेकअपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या मेकअपमध्ये सनीला ओळखणंही कठीण जातंय. फोटोमध्ये तिचा पूर्ण चेहरा कपड्याने गुंडाळलेला दिसतोय. या मेकअपसाठी तब्बल पाच ते सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.

आता बॉलिवूडच्या बेबी डॉलचा हा सिनेमा नक्की कोणता असणारे याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलीये.पण कुठला सिनेमा, कोण दिग्दर्शक हे सगळं गुलदस्त्यात ठेवलंय. सनी सिनेमात आपली प्रतिमा पूर्ण बदलण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी ती बरेच कष्ट घेतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...