S M L

बेबी डाॅलनंतर आता सनी लिओन बनली सेक्सी बार्बी डाॅल

'तेरा इंतजार' या अरबाज खान आणि सनी लिओनच्या आगामी सिनेमाची या महिन्यात घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिल्यानंतर आता सिनेनिर्मात्यांनी 'सेक्सी बार्बी डॉल' या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 7, 2017 03:33 PM IST

बेबी डाॅलनंतर आता सनी लिओन बनली सेक्सी बार्बी डाॅल

07 नोव्हेंबर : 'तेरा इंतजार' या अरबाज खान आणि सनी लिओनच्या आगामी सिनेमाची या महिन्यात घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिल्यानंतर आता सिनेनिर्मात्यांनी 'सेक्सी बार्बी डॉल' या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या गाण्यात सनी तिच्या डान्सचा आणि तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसतं आहे. नेहमीप्रमाणेच ही बार्बी डॉल तिच्या ग्लॅमरस अंदाजामध्ये तिच्या चाहत्यांवर जादू करणार हे नक्की.

या सिनेमाच्या निमित्ताने सनी पहिल्यांदाच अरबाज खानसह काम करताना दिसणार आहे. राजीव वालिया यांनी दिग्दर्शित केलेला नाट्यमय सिनेमा असणार आहे. या सिनेमाची निर्मिती अमन मेहता आणि बीजल मेहता यांनी केली आहे. सगळ्यांची उत्सुकता वाढवणारा  हा सिनेमा 24 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close