सनी लिओननं खरेदी केला कॅलिफोर्नियात बंगला

या बंगल्यात पाच बेडरूम्स, एक स्वीमिंग पूल, एक बगीचा आहे. शिवाय हा बंगला हाॅलिवूडच्या जवळ आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 04:42 PM IST

सनी लिओननं खरेदी केला कॅलिफोर्नियात बंगला

19 मे : सनी लिओननं नवा बंगला खरेदी केलाय. कुठे ठाऊकेय? कॅलिफोर्नियाच्या शर्मेन आॅक्स इथे. सनीनं या बंगल्यात आपला 36वा वाढदिवस नवरा डेनियल वेबर, कुटुंब आणि काही मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला.

या बंगल्यात पाच बेडरूम्स, एक स्वीमिंग पूल, एक बगीचा आहे. शिवाय हा बंगला हाॅलिवूडच्या जवळ आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर.

सनीच्या नवऱ्यानं सांगितलं, ' बरेच दिवस ते नव्या घराच्या शोधात होते. शेवटी तो मिळाला. या घरासाठी त्यांनी इटली, रोम, स्पेन इथून वस्तू खरेदी केल्यात.'  घर सजवण्यासाठी ते अनेक देशांमध्ये फिरले.

सनी लिओन सध्या बाॅलिवूडमध्ये बिझी आहे. आतापर्यंत तिनं 20पेक्षा जास्त सिनेमे केलेत. अलिकडे सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'मध्ये तिनं काम  केलंय. तिनं तिची पाॅर्न आर्टिस्टची प्रतिमा बदलून टाकलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...