गेल्या आठवड्यात मुंबईत असणारी सनी अचानक परदेशात, म्हणाली सिक्रेट ठिकाणी सर्वाधिक सुरक्षित

गेल्या आठवड्यात मुंबईत असणारी सनी अचानक परदेशात, म्हणाली सिक्रेट ठिकाणी सर्वाधिक सुरक्षित

कोरोनाच्या भीतीमुळे अभिनेत्री सनी लिओनी लॉकडाऊनमध्ये भारतातून परदेशात गेली असून त्याठिकाणी सर्वाधिक सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

लॉस एंजलिस, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे देशात नागरिक अडकून पडले आहेत. यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. दरम्यान अभिनेत्री सनी लिओनी ही अमेरिकेला निघून गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तशी पोस्टही केली आहे. सनी सध्या लॉस एंजलिस इथल्या तिच्या घरी राहत आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून सनी मुंबईमध्येच होती. मात्र तिला वाटतं की तिची मुलं अमेरिकेत सर्वाधिक सुरक्षित राहतील. म्हणून ती अमेरिकेला निघून गेली. सनी गेल्या 20 वर्षांपासून सनी मुंबईत राहते. रविवारी तिने मुलगी निशा आणि नोआह, अशेर या मुलांसह एक फोटो शेअर केला आहे. मदर्स डे निमित्त तिनं जगभरातील मातांना शुभेच्छा दिल्या होत्या.

सनीने म्हटलं की, जेव्हा तुमची मुलं असतात तेव्हा स्वत:चे प्राधान्यक्रम बदलतात. मला आणि डॅनियलला संधी मिळाली आणि मुलांना इथे घेऊन आलो. ते इथं जास्त सुरक्षित राहतील. आमच्या घरापासून दूर घरी आणि लॉस एंजलिसमध्ये आमचं सिक्रेट गार्डन आहे.

हे वाचा : घटस्फोटानंतरही हृतिकसोबत का राहतेय सुझान, स्वतःच सांगितलं या मागचं खरं कारण

गेल्या आठवड्यात मुंबईत असणारी सनी लिओनी अचानक अमेरिकेत कशी गेली असा प्रश्नही काहींना पडला आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सोडणाऱी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करताच सनी तिच्या कुटुंबासह अमेरिकेला गेली. दोन दिवसांपूर्वी ती अमेरिकेला पोहचली असून इन्स्टाग्रामवर तिने फोटोही शेअर केला. सनी अमेरिकेत पोहोचल्यानंतर तिच्या पतीने एक फोटो पोस्ट केला होता.

हे वाचा : सिनेमात एकत्र काम करण्यासाठी सारा अली खाननं बाबा सैफसमोर ठेवली 'ही' अट

First published: May 13, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या