Home /News /entertainment /

खांद्यावर कळशी घेऊन सनी लिओनीने केला डान्स; 'मस्ती ऑन सेट'चा VIDEO व्हायरल

खांद्यावर कळशी घेऊन सनी लिओनीने केला डान्स; 'मस्ती ऑन सेट'चा VIDEO व्हायरल

सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनामिकाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.

  मुंबई, 05 जानेवारी : अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) फारच कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सनी सोशल मीडियावरही अतिशय सक्रीय असते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ सनीच्या आगामी अनामिका या वेब सीरिजच्या सेटवरील आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे. सनीच्या हातात भांडी आहेत आणि ती डान्स करताना दिसत आहे. “मस्ती ऑन सेट” अशा आशयाचं कॅप्शन सनीने त्या व्हिडीओला दिलं आहे. सनीच्या या व्हिडीओला काही तासांतच लाखो व्ह्यूज आले. काही दिवसांपूर्वीच सनीने अनामिका सिनेमात काम करणार असल्याची घोषणा केली. विक्रम भट्ट यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं असून, सनीसोबत सोनाली सहगलसुद्धा दिसणार आहे. सनीने काही दिवसांपूर्वी सोनाली आणि विक्रम भट्टसोबत एक फोटो शेअर केला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  View this post on Instagram

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  या सीरिजव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे. सनी बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. सनीचं वेळापत्रक सध्या अतिशय व्यस्त आहे. लॉकडाऊनच्या काळात तिने कुटुंबासोबत यूएसमध्ये वेळ घालवला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Sunny Leone

  पुढील बातम्या