सनी लिऑनी साकारणार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका ?

सनी लिऑनी साकारणार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका ?

अभिनेत्री सनी लिऑनी मीना कुमारी यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येते आहे. मीना कुमारी यांचं आत्मचरित्र साकारण्यासाठी सनी लिऑनी दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंत आहे.

  • Share this:

17 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर सिनेमा तयार होणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक करण राजदान हे मीना कुमारी यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर उलगडणार आहेत.

या सिनेमासाठी अभिनेत्री कोण असणार ? यावरही बरीच चर्चा झाली. पण आता अभिनेत्री सनी लिऑनी मीना कुमारी यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येते आहे. मीना कुमारी यांचं आत्मचरित्र साकारण्यासाठी सनी लिऑनी दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंत आहे. दिग्दर्शक करण राजदान यांनी मीना कुमारी यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन व माधुरी दिक्षीत यांनाही विचारणा करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी या भूमिकेस नकार दिला.

मीना कुमारी यांची भूमिका साकारण्यासाठी सनी लिऑनीने जास्त उत्साह दाखविल्याचं दिग्दर्शक करण राजदान यांनी सांगितलं आहे. मीना कुमारी यांची भूमिका साकारण्याचं सनीने धाडस दाखविलंय खरं पण तिला हे जमणार आहे की नाही हे येता काळच सांगेण. सिनेमाचं शूटिंग कधी सुरू करायचं ? याविषयी उत्सुकता दाखविणारी सनी एकचं अभिनेत्री होती, असं सिनेमाचे दिग्दर्शक करण राजदान यांनी इंडियन एक्स्प्रेसची बोलताना सांगितलं आहे.

करण राजदान पुढे म्हणाले की, 'सनी लिऑनीला मी तिच्या घरी भेटलो होतो. सिनेमावरून बऱ्याच गप्पा झाल्या. मीना कुमारी यांच्या भूमिकेसाठी सनी लिऑनी योग्य असेल की नाही याबद्दलची माहिती नव्हती. पण एखाद्या भूमिकेसाठी ती अतिशय उत्साही असते. मीना कुमारी यांची भूमिका साकारणं ही मोठी संधी असल्याचं तीचं मत आहे.' नुकताच सनी लिऑनीचा तेरा इंतेजार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता अरबाज खानबरोबर या सिनेमात तिने काम केलं. त्यामुळे आता सनीच्या या सिनेमाबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

First published: December 17, 2017, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading