...जेव्हा केक चोरताना पकडली जाते सनी लिओनी

...जेव्हा केक चोरताना पकडली जाते सनी लिओनी

सनीनं नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती केकची चोरी करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी सध्या तिच्या नव्या प्रोजेक्टचं काम करण्यात व्यस्त आहे. पण ती कामात कितीही बिझी असली तरीही सेटवर मस्तीही तितकीच जोरदार करते. ज्यामुळे सेटवरील वातावरणही हसतंखेळतं राहतं. सेटवरचे व्हिडीओ अनेकदा ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करतानाही दिसते. नुकतंच सनीनं एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. मात्र यावेळी सनी चक्क चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाली.

सनीनं नुकतंच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती केक चोरताना दिसत आहे. या व्हिडीओला सनीनं एक गंमतीशीर कॅप्शनही दिलं आहे. 'काम करता करता मी खूप एंजॉयसुद्धा करते. पण माझी टीम मला केकचा एक तुकडाही देत नाही. सर्वजण केक स्वतःच खातात, पण मला साधं विचारतही नाहीत' असं सनीनं लिहिलंय. या व्हिडीओत सनी केकचे काही तुकडे आपल्या बॅगमध्ये लपवतानाही दिसत आहे. मात्र यावेळी ती पकडली जाते.

केक चोरताना पकडली गेल्यावर सनी सांगते की, 'मी एवढी मेहनत करुन काम करते... तरी कोणीही माझ्यासाठी थोडासा केक ठेवत नाही''. हा व्हिडीओ पाहिल्यावर सनी आणि तिच्या टीममधील बाँडिंग तसंच सेटवरील वातावरण हसतं खेळतं कसं ठेवते हे दिसून येतं. सध्या सनी आपल्या कामात व्यस्त असून लवकरच ती दोन टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती एक हिंदी आणि एक दाक्षिणात्य चित्रपटातही झळकणार आहे.

First published: March 26, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading