सनी लिओनीनं सांगितलं सत्य, इंटीमेट सीन शूट करताना कशी असते सेटवरील परिस्थिती

सनी लिओनीनं सांगितलं सत्य, इंटीमेट सीन शूट करताना कशी असते सेटवरील परिस्थिती

अडल्ट इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सनीला इथे टिकून राहण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.

  • Share this:

मुंबई, 1 जून : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. अडल्ट सिनेमा सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना कधीच बिचकत नाही. नुकत्याच दिलेल्या एक मुलखातीत सनीनं तिच्या खासगी जीवनातील अनेक गोष्टींचा खुलसा केला आणि यासोबतच सनीनं जेव्हा एखाद्या सिनेमातील इंटीमेट सीन शूट होत असतो त्यावेळी नेमकं काय होतं हे सुद्धा या मुलाखतीत सांगितलं आहे.

अडल्ट इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सनीला इथे टिकून राहण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. अनेक मुलाखतींमध्ये तिला तिच्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारले जातात. मात्र अशा परिस्थिती सनी नेहमीच न बिचकता सर्व प्रश्नांची उत्तर देताना दिसते. नुकत्याच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिला सिनेमातील तिच्या इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सनीनं सेटवरील सत्य परिस्थिती कथन केली.

सनी म्हणाली, हा खूपच वेळ असतो जेव्हा तुम्ही एका इंटिमेट सीनचं शूट करत असता आणि तुमच्या आजूबाजूला 100 माणसं वावरत असतात आणि त्याहून वाईट हे असतं की त्यातल्या 50 लोकांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या असतात. अशावेळी तो सीन शूट करण खूपच कठीण होतं. मला हेच समजत नाही की लोक हातात चहाचा कप घेऊन त्याठिकाणी का उभे असतात. या मुलाखतीत सनीनं सांगितलं की जर ती अभिनेत्री नसती तर मॅकडोनल्डची कर्मचारी असती.

काही दिवसांपूर्वी आलेल्या SEMrush Study च्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनमध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या भारतीय सेलिब्रेटींमध्ये प्रियांका चोप्रानंतर सनी लिओनीचा नंबर लागतो. या रिपोर्टनुसार इंटरनेटवर सर्च झालेल्या भारतीय सेलिब्रेटींमध्ये प्रियांका चोप्रा, सनी लिओनी आणि कतरिना कैफ आघाडीवर आहेत.

First published: June 1, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या